Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राहक पेठेच्या चहापान उपक्रमाला ३ हजार मतदारांनी दिली भेट ग्राहक पेठ व...

ग्राहक पेठेच्या चहापान उपक्रमाला ३ हजार मतदारांनी दिली भेट ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीतर्फे सकाळी लवकर मतदान करणाऱ्यांना मोफत चहा आणि क्रीमरोल

पुणे : टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ आणि ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आलेल्या ‘अगोदर मतदान नंतर चहापान ग्राहक पेठेत’ या उपक्रमाला पुणेकर मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. तब्बल ३ हजार मतदारांनी मतदान करून ग्राहक पेठेत चहापानाचा आनंद घेतला. अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.

 

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, राजेश पांडे, हेमंत रासने, धीरज घाटे यांसह पुण्यातील बहुतेक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमाला भेट दिली.

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, ग्राहकपेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जागृतीसाठी गेले काही दिवस प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. या उपक्रमामुळे सकाळी मतदान अधिक होण्यास मदत झाली, यासाठी अनेकांनी ग्राहकपेठ व ग्राहक पंचायतीचे कौतुक केले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments