Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorized- ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान

– ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान

पिंपरी, दिनांक – ७ डिसेंबर २०२३ :- महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवी दिशा या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून प्रतिष्ठीत समजला जाणारा ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला सन्मान पदकाने गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू येथे ग्वांगझू सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, समुह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे महापालिकेला मिळालेला हा बहुमान असून शहरवासीयांप्रती आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारप्राप्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांचे देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला देऊन महिला बचत गटांना देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये ५४ देशांतील १९३ शहरांचा समावेश होता, यामध्ये पिंपरी चिंचवड शहराने नाविन्यपूर्णता, परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली आपली वचनबद्धता दर्शवली. नवी दिशा उपक्रमाद्वारे महापालिकेने स्वच्छतेसोबत शहरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देत कार्यक्षम प्रशासनाचे यश देखील अधोरेखित केले.दिनांक ११ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असलेल्या एका तांत्रिक समितीने पिंपरी चिंचवड शहरातील नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यांसारख्या निकषांचे मुल्यमापन केले.अंतिम १५ निवडलेल्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवड, भारत; अंतल्या, तुर्किये; बोगोटा, कोलंबिया; केप टाउन, दक्षिण आफ्रिका; ग्वांगजू, कोरिया; हलांद्री, ग्रीस; इज्तापालापा, मेक्सिको; जकार्ता, इंडोनेशिया; कंपाला, युगांडा; कझान, रशिया; मॅनहाइम, जर्मनी; रामल्लाह, पॅलेस्टाईन; साओ पाउलो, ब्राझील; तेहरान, इराण; आणि क्सियानिंग, चीन या शहरांचा समावेश होता.पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या या सन्मानाबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहराला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे महापालिकेने परिवर्तनशील शहरी विकासाकडे टाकलेले एक पाऊल आहे. महिला बचत गटांच्या प्रयत्नातून चालवलेला नवी दिशा उपक्रम सर्वसमावेशक वचनबद्धतेचे आणि शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या या जागतिक मान्यतेमध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व भागधारकांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे. नवी दिशा उपक्रमामध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा आणि येत्या काही महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या तीन पटीने वाढवण्याची योजना महापालिका आखत आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

Previous article
आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त पुण्यात पालखी सोहळा रविवारी (दि. १०) श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ.पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; राजगडावर होणार मुख्य सोहळा पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ.पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा, किल्ले राजगड’ गेली ४२ वर्षे साजरा करण्यात येत आहे. यंदाचे सोहळ्याचे हे ४३ वे वर्ष आहे. यावर्षी पुण्यामध्ये लालमहाल येथे रविवार, दि.१० डिसेंबर २०२३ सकाळी ११ वाजता लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा होईल.ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांचे विद्यार्थी करतील. एच.व्ही.देसाई महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख गणेश राऊत यांचे शिवचरित्रावर व्याख्यान देखील होणार आहे. तसेच सालाबादप्रमाणे यावर्षी दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,वक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अ‍ॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आग्र्याहून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी : ६.०० वा. किल्ले राजगड येथे सूर्योदयाला ध्वजारोहण होईल. किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा होणार आहे. तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Next article
सशस्त्र सेना ध्वज दिनी जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अनोखी मानवंदना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चा उपक्रम ; तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे : भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साज-या करण्यात येणा-या सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे साकारण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे यादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे. * फोटो ओळ – न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments