Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मल्टिडिसिप्लिनरी मेडिकल जेनेटिक्स विभाग सुरू

केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मल्टिडिसिप्लिनरी मेडिकल जेनेटिक्स विभाग सुरू

पुणे 14 मे 24: केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मल्टिडिसिप्लिनरी मेडिकल जेनेटिक्स विभाग सुरू करण्यात आला आहे.हा अशा प्रकारचा शहरातील पहिला विभाग आहे. या विभागामध्ये रिप्रॉडक्टिव्ह जेनेटिक्स (प्रजनन अनुवांशिक शास्त्र),कॅन्सर जेनेटिक्स (कर्करोग अनुवांशिक शास्त्र) ,न्यूरो जेनेटिक्स (मेंदूविकार अनुवांशिक शास्त्र) आणि नेफ्रो जेनेटिक्स (मूत्रविकार अनुवांशिक शास्त्र) यांचा समावेश आहे. या विभागामध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या व अनुवांशिक शास्त्रसंदर्भात समुपदेशन सेवा उपलब्ध होतील. केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक झक्सेस कोयाजी, प्रसूती व स्त्रीरोग शास्त्र विभागाचे संचालक व कन्सल्टंट डॉ. व्ही एम जोशी आणि रुग्णालयाच्या टीममधील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मेडिकल जेनेटिक्स विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

 

या विभागामध्ये अनुवंशशास्त्रज्ञ (जेनेटिसिस्ट ) डॉ. मीनल अग्रवाल, डॉ. चैतन्य दातार आणि डॉ. मनीषा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष सेवांचा समावेश करण्यात आला आहे. तीन विशेष अनुवंशशास्त्रज्ञांसह स्थापन झालेल्या बहुआयामी मेडिकल जेनेटिक्स विभागामुळे केईएम हॉस्पिटल ने देशातील काही निवडक हॉस्पिटल्सच्या यादीत स्थान मिळवलेआहे.

 

केईएम पुणेच्या वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. मीनल अग्रवाल म्हणाल्या की, अनुवांशिक सेवांमध्ये बहु-विभागांचा सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. केईएम हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल जेनेटिक्स विभाग हा कर्करोग, मूत्रविकार, मेंदूविकार,बालरोग विभाग तसेच स्त्री रोग व प्रसूती, आयव्हीएफ आणि फिटल मेडिसिन (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह थेरपी – एआरटी) विभाग यासह सर्वसमावेशक जेनेटिक टेस्टिंग सेवा व चाचणीपूर्व आणि चाचणीपश्चात समुपदेशनाचा समावेश आहे.रुग्णांना त्यांच्या प्राथमिक डॉक्टरांचे मार्गदर्शन असेल पण याशिवाय जेनेटिक्स टीम त्यांना अनुवांशिक चाचणी , समुपदेशन आणि पुढील व्यवस्थापनासाठी सहकार्य करेल. पूर्व चाचणी आणि चाचणी पश्चात समुपदेशन हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे

 

रिप्रॉडक्टिव्ह जेनेटिक्स मध्ये गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांसाठी गर्भधारणापूर्व अनुवांशिक चाचणी, गरोदर जोडप्यांसाठी तसेच विकासात्मक विकार,स्वमग्नता सारख्या विशिष्ट विकारांचे अनुवांशिक वैद्यकीय इतिहास असलेल्या जोडप्यांसाठी अनुवांशिक चाचणी उपलब्ध असणार आहेत.

 

कुटुंबातील अनुवांशिक आजारांची चाचणी ही कॅन्सर जेनेटिक्समध्ये जोखमीची पातळी ओळखून प्रतिबंधात्मक उपचार करण्यास घेण्यास मदत होईल. तसेच ज्यांना कर्करोगाचे निदान झाले आहे त्यांना कर्करोगग्रस्त पेशींच्या अनुवांशिक चाचणीद्वारे उपचाराची योग्य दिशा ठरवून लक्ष्यित थेरपीजचा देता येतील.

 

त्याचप्रमाणे, न्यूरोजेनेटिक्समध्ये, फेफरे किंवा चयापचयाच्या लोकांची अनुवांशिक चाचणी करून विशिष्ट अनुवांशिक दोषांसाठी योग्य औषधे किंवा लक्ष्यित थेरपी निश्चित करण्यात मदत होणार आहे.

 

लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये बहुतेक मूत्रपिंड विकार हे जनुकीय असतात, त्यामुळे नेफ्रो जेनेटिक्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. हा विभाग अनुवांशिक चाचणी, उपचारांसाठी योजना तयार करणे, विशिष्ट उपचार प्रोटोकॉल आणि पुढील गर्भधारणेसाठी सल्ला देण्यास मदत करेल.

 

डॉ.अग्रवाल म्हणाल्या की, अनुवांशिक चाचण्या या बहुतेक रक्ताच्या चाचण्यांच्या स्वरूपात असतात; तरी देखील,नेहमीच्या ‘होय किंवा नाही’ उत्तर मिळणाऱ्या या साध्या रक्त चाचण्या नसतात. त्यात अनेक बारकावे व पैलू असतात आणि म्हणूनच चाचणीपूर्व आणि पश्चात समुपदेशन अत्यंत महत्वपूर्ण आहे.

 

सर्व जनुकीय विकार हे आधीच्या पिढ्यांकडून येत असतात हा एक गैरसमज आहे.किंबहुना बहुतेक जनुकीय विकार हे कौटुंबिक वैद्यकीय इतिहास नसताना होऊ शकतात. जनुकीय चाचणी केवळ पुढच्या पिढीच्या चांगल्या आरोग्यासाठीच नव्हे तर अनुवांशिक चाचणी घेत असलेल्या बाधित व्यक्तींच्या उपचारातही मदत करते.

 

केईएम हॉस्पिटल पुणे चे वरिष्ठ उपवैद्यकीय प्रशासक डॉ.मधुर राव म्हणाले की,हा केवळ आमच्या रुग्णालयासाठीच नव्हे तर पुण्यातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठीही एक महत्त्वाचा टप्पा आहे. वैद्यकीय शास्त्र जसजसे पुढे प्रगती करेल तसतसे आम्ही भविष्यात इतर विभागांमध्येही या सेवेचा विस्तार करू.

 

केईएम हॉस्पिटल पुणेच्या प्रशासक शिरीन वाडिया म्हणाल्या की, विशेष वैद्यकीय विभाग हे सर्वसामान्यांना किफायतशीर दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवून देण्याची आमची वचनबद्धता दर्शविते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments