Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोलापूरात रा.स्व संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाला प्रारंभ...▪️  ▪️प्रांतातून ३६०...

सोलापूरात रा.स्व संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाला प्रारंभ…▪️  ▪️प्रांतातून ३६० स्वयंसेवकांचा सहभाग▪️

 

सोलापूर दि. १७ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ हरिभाई देवकरण प्रशालेत झाला.

या वर्गामध्ये प्रांतातून ३६० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून भारतमाता पूजनाने वर्गाची सुरुवात झाली. १७मे ते ०२ जूनपर्यंत हा वर्ग चालणार असून २ जूनला जाहीर समारोप होणार आहे. वर्गासाठी प्रांतामधील विविध जिल्ह्यांमधून स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. रा. स्व. संघाच्या दृष्टीने २४ आणि शासकीय स्तरावरील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमधून शिक्षार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत.

त्यांचे वयोगटाप्रमाणे विविध समूह करण्यात आले आहेत. या वर्गात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या वर्गाला संघाचे क्षेत्रीय व प्रांत स्तरावरील पदाधिकारी भेट देणार आहेत. पहाटे योग, शारीरिक व्यायाम, नियुद्ध (कराटे), दंड नंतर गटश: चर्चा, बौद्धिक, विचारमंथन, चिंतन, सायंकाळी संघस्थान असे नियोजनबद्ध कार्यक्रम वर्गात आखण्यात आलेले आहेत. त्याशिवाय सेवा,संपर्क,प्रचार आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वाधिकारी म्हणून श्री. रवींद्र वंझारवाडकर व वर्ग कार्यवाह म्हणून श्री.राहुल पुंडे यांच्याकडे जबाबदारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments