पुणे, २१ मे २०२४ : सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेज, किवळे ने मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत १०० % निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील १३२ विद्यार्थी डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण झाले तर १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजूमदार, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजूमदार, प्राचार्य भावना नरसिंगोजू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रथम तीन क्रमांकाचे निकाल खालील प्रमाणे आहे
कला शाखा :
प्रथम क्रमांक : प्रेशिता नवीन माळोदे (९४.६७%)
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक : अमृता हरिहरन (८९.००%)
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक : प्रियांका पिल्लई (९२.८३%)


