पुणे, महाराष्ट्र, 22-05-2024: पुण्यातील इन्फिनिटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंतर्गत पुण्यातील सर्वांत मोठा 400 किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सोलर प्रकल्प भारतातील सोलर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सोलारस्क्वेअरद्वारा कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प सोलारस्क्वेअरच्या पोर्टफोलिओमधील सहकारी गृहनिर्माण सोसायटीसाठी बसवला गेलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे.
नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून सदर प्रकल्पाला पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत ₹70 लाखांचे भरीव केंद्रीय अनुदान मिळणार आहे. प्रीमियरचे Mono-PERC Halfcut Bifacial 540 Wp क्षमतेचे सोलर पॅनेल आणि SolarEdge च्या पॉवर ऑप्टिमायझरवर आधारित इन्व्हर्टरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इन्फिनिटीच्या 8 टॉवर्समध्ये हा ग्राउंडब्रेकिंग सोलर प्रकल्प स्थापित केलेला आहे. विशेष म्हणजे या सोलर प्रकल्पामध्ये सोलारस्क्वेअरच्या इंटेलिजेंट विंडप्रो माउंट™ चक्रीवादळप्रूफ संरचनेचा देखील वापर केलेला आहे.
सदर प्रकल्पाच्या उदघाटनानंतर सोलारस्क्वेअरचे संस्थापक निखिल नहार म्हणाले, “सोलारस्क्वेअरद्वारा इन्फिनिटीसाठी कार्यान्वित केला गेलेला हा प्रकल्प म्हणजे स्वच्छ व हरित ऊर्जा निर्मितीसाठी उचललेले शाश्वत पाऊल आहे. या सौर प्रकल्पाच्या अनावरणाबरोबर पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जास्वातंत्र्य यासाठी इन्फिनिटीला सक्षम करत आहोत. हा प्रकल्प इन्फिनिटीच्या वीज बिलात रू. 1 कोटी पेक्षा जास्त वार्षिक बचत आणून पुढील 25 वर्षांत 10000 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदतगार ठरणार आहे.”
या समारंभास प्रमुख पाहुणे श्री. चेतन तुपे (आमदार, हडपसर विधानसभा), श्री. निखिल नहार (संस्थापक-संचालक, सोलारस्क्वेअर), श्रीमती रुची पुरी (अध्यक्षा, इन्फिनिटी), श्री. पंकज कुमार (सचिव, इन्फिनिटी) आणि श्री. आकाश सोनटक्के (सोलर समिती प्रमुख, इन्फिनिटी) आदि मान्यवर उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्पाचे सर्वेक्षण केल्यावर श्री. चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा यांनी सोसायटीतील लोकांचे अभिनंदन केले आणि सहभागी सर्व लोकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “हा ग्राउंडब्रेकिंग सौर प्रकल्प पुण्यातील इतर सोसायट्यांना शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे जाण्यासाठी एक मानदंड स्थापित करतो. ग्लोबल वॉर्मिंग ही एकेकाळी अज्ञात संज्ञा होती. परंतु, आज ती आपल्या दारात येऊन ठेपली आहे. तीव्र हवामान बदल आपण अनुभवत आहोत. आपण आता पाऊल उचलले नाही तर आपल्या भावी पिढ्यांना भविष्य उरणार नाही. हा सौर प्रकल्प शाश्वत भविष्याच्या दिशेने घेतलेले एक स्तुत्य पाऊल आहे. मी इन्फिनिटी सोसायटी समितीच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि आशा करतो की इतर गृहनिर्माणसंस्था त्यांचे अनुकरण करतील.”
इन्फिनिटीचे सचिव श्री. पंकज कुमार म्हणाले, “सौरऊर्जा वापरण्याचा आमचा निर्णय सतत वाढणारे वीजबिल आणि देशाच्या अक्षय ऊर्जा निर्मितीमधे योगदान देण्याच्या आमच्या इच्छेमुळे झाला. देशाची विजेची मागणी वाढत असल्याने आणि नैसर्गिक संसाधने दिवसेंदिवस कमी होत असल्याने ही कृती अत्यावश्यक होती.”
इन्फिनिटी समितीचे सदस्य श्री. पंकज सक्सेना म्हणाले, “प्रत्येक ग्राहकाला स्वावलंबी बनवून आणि शाश्वत पर्याययांची निवड करून, आपण अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यास मदत होईल.”
उद्घाटनानंतर, भारतातील सर्वोत्तम रूफटॉप सोलर कंपनी, सोलारस्क्वेअर एनर्जीने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौर उर्जेचा वापर करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि विविध फायद्यांवर चर्चा करण्यासाठी एक माहिती सत्र आयोजित केले होते.
इन्फिनिटीचे श्री. विकास यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सोलारस्क्वेअरने इन्फिनिटीच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना ‘क्लायमेट हिरो’ स्मृतीचिन्ह प्रदान केले.
सोलारस्क्वेअरबद्दल अधिक माहिती:
सोलारस्क्वेअर ही भारतातील सर्वोत्तम रूफटॉप सोलर कंपनी आहे जी घरे, गृहनिर्माण संस्था आणि व्यवसायांसाठी सोलर पॅनेल सिस्टीम डिझाइन आणि स्थापित करते. आम्ही नवनवीन टेक्नोलॉजीचा वापर व सर्वोत्तम सेवा देण्यास वचनबद्ध आहोत. प्रत्येक घराच्या माध्यमातून ‘हर घर सौर मिशन’ पुढे घेऊन जाणे हे आमचे लक्ष्य आहे.
नीरज जैन, निखिल नहार आणि श्रेया मिश्रा या उत्साही त्रिकूटाने 2015 मध्ये या कंपनीची स्थापना केली. आमचा उद्देश केवळ कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा नसून आम्हाला घरे आणि व्यवसायांसाठी लागणाऱ्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे.


