Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedलीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे लीला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम

लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे लीला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम

पुणे, २४ मे २०२४ : लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भावी पिढीचा विकास करण्याच्या दृष्टीने आपली वचनबद्धता मजबूत करत लीला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (एलएलडीपी) – क्लास 2025 हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 19 मे रोजी द लीला ॲम्बियंस गुरुग्राम हॉटेल अँड रेसिडेन्स येथे उमेदवारांच्या नवीन गटाचे स्वागत करण्यात आले. हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम इंडियन स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी (आयएसएच) च्या भागीदारीने आणि हॉस्पिटॅलिटी एज्युकेशनची पुनर्कल्पना करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थेच्या लेस रोचेसच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भावी पिढीचा विकास करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला हा एक व्यापक अभ्यासक्रम आहे.यामध्ये बूट कॅम्प, क्लासरूम ट्रेनिंग, ऑनलाइन कोर्सेस आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समावेश आहे. लीला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 15-महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये कॅपस्टोन प्रकल्प, मूल्यमापन आणि लीलाच्या प्रतिष्ठित गुणधर्मांवर सर्वसमावेशक मार्गदर्शनाद्वारे उद्योगातील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments