पुणे येथील संत जनाबाई मुलींच्या शासकीय वसतिगृह व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात*

तारां कित Avatar

*
पुणे, दि. ५ : पुणे येथील संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या दोन्हीही वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु पुणे परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थींनींना विनामूल्य निवास, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, निर्वाह भत्ता व शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

विद्यार्थींनींनी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, त्यांच्या व वडिलांच्या आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची छायांकित प्रत, बोनाफाईड इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक विद्यार्थींनींनी व पालकांनी संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पुणे -१ येथे संपर्क साधून प्रवेश अर्ज घेऊन परिपूर्ण भरून द्यावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. शेलार यांनी केले आहे.
००००

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts