Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedधावडे वस्ती, भोसरी येथील कॉलरा आजाराच्या उद्रेकाबाबत माहिती

धावडे वस्ती, भोसरी येथील कॉलरा आजाराच्या उद्रेकाबाबत माहिती

रुग्णांबाबतची माहिती :
दि.०८/०६/२०२४ : पहिला रुग्ण आढळून आला.
दि.१३/०६/२०२४ : सर्वेक्षणानंतर ३ अजून रुग्ण आढळून आले.
दि.१४/०६/२०२४ : सर्व रुग्णांवर पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
आज कोणत्याही नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही.
दि.१४/०६/२०२४ : आजची रुग्णस्थिती
रुग्णसंख्या
तपासणी
उपचार
३
कॉलरा-कल्चर पॉझिटिव्ह
सर्व वायसीएम रुग्णालय येथे उपचार सुरु
सर्वांची प्रकृती स्थिर आहे

वैद्यकीय विभागामार्फत केलेल्या आणि सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती :
फिल्ड कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर संशयित रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण :
नवीन भोसरी रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या धावडे वस्ती परिसरामध्ये पहिला रुग्ण आढळून आल्याच्या दिनांकापासून फिल्ड कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे.
२ सदस्य असलेल्या एकूण ४४ टीम्स मार्फत आजअखेर ६,१४४ घरे व १६,३५६ इतक्या नागरिकांचे करण्यात आलेले आहे व दैनंदिन सुरु राहणार आहे.
संशयित असलेले रुग्ण सापडताच लागलीच त्यांचे विष्ठा नमुने वायसीएम रुग्णालय येथे पाठविण्यात येत आहेत
सर्व घरांमध्ये जलसंजीवनीच्या (ORS) पाकीतांचे वाटप करण्यात आलेले आहे
पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासितांना खबरदारी म्हणून Chemoprophylaxis करिता Cap Doxycycline 100 mg आणि Cap Omez याचे वाटप करण्यात आलेले आहे.

पाणी तपासणी कार्यवाही :
वैद्यकीय विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त सर्वेक्षणामध्ये फिल्डवर पाण्याच्या ओटी (Orthotolidine Test) करण्यात आली आहे
वैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेली माहिती व आवाहन :
पाणी उकळून व थंड करून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे
जुलाब/उलटी आजाराचे रुग्ण असल्यास तत्काळ मनपाचे कर्मचारी यांना संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे.
बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरी अथवा इतर पाणीसाठ्या मधुन पाण्याचा वापर ना करणे
शिळे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत व अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत
नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत
नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.
भैरवनाथ शाळा, धावडे वस्ती फिल्ड दवाखाना स्थापना
संशयित रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात ओपीडी दवाखाना सुरु करण्यात आलेला आहे
तात्काळ उपचार करण्यात येत आहेत
आवश्यकता असल्यास रुग्णास नवीन भोसरी रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येते.
वैद्यकीय विभागामार्फत धावडे वस्ती परिसरामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता रिक्षाद्वारे जनजागृतीपर माईकिंग करण्यात येत आहे.
उद्यापासून धावडे वस्ती परिसरामध्ये पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जलजन्य आजार आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
परिसरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सभा घेण्यात आलेली असून त्यांना असे रुग्ण आढळल्यास तत्काळ मनापास कालाविण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.
मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात आलेली आहे.
मनपामार्फत धावडे वस्ती परिसरातील सर्व घरांना दिनांक १४/०६/२०२४ पासून टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments