मुंबई, 18 जून 2024 – पुण्यात मुख्यालय असलेल्या नाईकनवरे डेव्हलपर्स ने मुंबईतील सांताक्रुझ मधील वाकोला येथे असलेल्या ‘जागृती’ या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पातील ८० कुटूंबांना घरांचा ताबा दिल्याची घोषणा केली. हा महत्त्वपूर्ण टप्पा सुमारे 12 एकरांत पसरलेल्या प्रकल्पातील दुसऱ्या टॉवरच्या पूर्णत्वाचे चिन्ह आहे.
जागृती झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची सुरुवात 15 डिसेंबर 2022 रोजी झाली आणि एकूण 45,000 चौरस मीटर विकास क्षेत्रावर पसरले आहे. सुपूर्द केल्या जाणाऱ्या टॉवरमध्ये G+9 रचना असून यामध्ये ८० कुटूंबांचे पुर्नवसन करण्यात आले आहे, यातील प्रत्येक युनिट ही अंदाजे 300 चौरस फूट गालिचा क्षेत्राच्या कायदेशीर मानकांचे पालन करते.
नाईकनवरे डेवलपर्स चे संचालक श्री. हेमंत नाईकनवरे यांनी या प्रसंगी भाष्य केले, “झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत 80 पात्र कुटुंबांना ही घरे सुपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही नेहमीच गुणवत्तेसह वेळेत घरे देण्यावर भर देत असतो आणि आंम्हाला आशा आहे की आम्ही गरजवंतांना सर्वोत्कृष्ट घरे देण्यावर भर देत राहू.”
चाव्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय पोटनीस उपस्थित होते. आमदार संजय पोटनीस यांनी नाईकनवरे डेवलपर्स चे उत्कृष्टतेच्या प्रति समर्पणाबद्दल आणि समाजाला महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, “आज या उल्लेखनीय टप्प्याचे साक्षीदार होण्यासाठी मी येथे उपस्थित आहे याचा मला सन्मान आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील पुर्नविकासाच्या भवितव्या मध्ये नवीन बेंचमार्क निर्माण झाला आहे.”
घरांचा ताबा देणे ही एक टप्प्याटप्प्याने पुनर्विकास धोरणाचा एक भाग आहे, नाईकनवरे डेवलपर्स यांनी पुण्यातही यशस्वीरित्या एसआरए प्रकल्पांची पूर्णता केली आहे. आजपर्यंत, कंपनीने पुणे आणि मुंबईमध्ये 1400 हून अधिक घरांचा ताबा दिला असून यांतील ७८ घरांचा ताबा आज देण्यात आला. याशिवाय, पुढील 12 महिन्यांत आणखी 370 घरांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.


