Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशनकडून इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसच्‍या १०व्‍या पर्वासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन

मेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशनकडून इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसच्‍या १०व्‍या पर्वासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन

मुंबई, जून १८, २०२४: मेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशन (एमआयएफ) या भारतातील प्रभावी इनोव्‍हेशन्‍सना चालना देण्‍यामध्‍ये अग्रणी असलेल्‍या कंपनीने आज त्‍यांच्‍या द्विवार्षिक ‘इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डस्’च्‍या १०व्‍या पर्वासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्‍याची घोषणा केली आहे. २००६ मध्‍ये स्‍थापित करण्‍यात आलेला हा भारतातील पहिला प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे, जो मोठ्या प्रमाणात सकारात्‍मक सामाजिक, पर्यावरणीय व आर्थिक प्रभावाला गती देण्‍याची क्षमता असलेल्‍या उल्‍लेखनीय इनोव्‍हेशन्‍सना ओळखण्‍यासह पाठिंबा देण्‍याप्रती समर्पित आहे. या उल्‍लेखनीय १०व्‍या पर्वाला साजरे करत फाऊंडेशन नाविन्‍यतेला गती देण्‍याच्‍या वारसाला प्रकाशझोतात आणते आणि परिवर्तनात्‍मक बदलाला चालना देण्‍याचे आपले मिशन सुरू ठेवण्‍यास उत्‍सुक आहे.

अवॉर्डसचे १०वे पर्व दोन श्रेणींमधील इनोव्‍हेशन्‍सना प्रकाशझोतात आणेल. बिझनेस श्रेणीमध्‍ये भारतातील स्‍टार्टअप्‍ससह नफा-तत्त्वावर असलेल्‍या कंपन्‍यांचा समावेश आहे. सोशल श्रेणीमध्‍ये ना-नफा तत्त्‍वावर आधारित कंपन्‍यांचा समावेश आहे जसे सरकारी कंपन्‍या, परोपकारी संस्‍था, चॅरिटेबल ट्रस्‍ट्स, बहुपक्षीय एजन्‍सीज, कम्‍युनिटी फाऊंडेशन्‍स, एनजीओ आणि सीएसआर/कॉर्पोरेट फंड्स.

अर्ज प्रक्रिया १७ जून २०२४ पासून १७ जुलै २०२४ पर्यंत सुरू राहिल. इच्‍छुक इनोव्‍हेटर्सना ऑफिशियल वेबसाइट [https://form.jotform.com/MIFAwards/mif_innovation-for-india-awards_app] च्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या प्रवेशिका सबमिट करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. त्‍यानंतर ऑगस्‍ट २०२४ ते मार्च २०२५ या आठ महिन्‍यांच्‍या कालावधीत इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डससाठी मूल्‍यांकन प्रक्रिया घेण्‍यात येईल. यामध्‍ये प्रत्‍येक श्रेणीसाठी स्‍वतंत्र ज्‍युरीकडून मूल्‍यांकनांच्‍या दोन फेऱ्या आणि स्‍वतंत्र नॉलेज पार्टनरकडून सविस्‍तर ऑन-ग्राऊंड मेहनतीचा समावेश आहे. दोन्‍ही श्रेणींसाठी ज्‍युरीमध्‍ये भारतातील काही प्रख्‍यात व्‍यवसाय व सामाजिक प्रमुखांचा समावेश आहे, जसे बेन कॅपिटल इंडियाचे अध्‍यक्ष व एटीई चंद्रा फाऊंडेशनचे सह-संस्‍थापक अमित चंद्रा (ज्‍युरी अध्‍यक्ष), लेडीज हू लीडच्‍या संस्‍थापक व माजी-पत्रकार आभा बाकाया, नॅसकॉमचे अध्‍यक्ष देबजानी घोष, सेल्‍को फाऊंडेशनचे संचालक हुडा जाफर आणि एज्‍युकेट गर्ल्‍सच्‍या संस्‍थापक सफीना हुसैन. इनोव्‍हेशन, इम्‍पॅक्‍ट, स्‍केलेबिलिटी आणि लाँग-टर्म वायॅ‍बिलिटी या निकषांच्‍या आधारावर अवॉर्डससाठी अर्जांचे मूल्‍यांकन करण्‍यात येईल.

मेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशनचे संस्‍थापक हर्ष मारिवाला म्‍हणाले, ”इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसच्‍या १०व्‍या पर्वासाठी आम्‍ही परिवर्तनात्‍मक इनोव्‍हेशन्‍सच्‍या वारसाला सादर करत आहोत, ज्‍यांनी देशामध्‍ये मोठा प्रभाव निर्माण केला आहे. तसेच आम्‍ही इनोव्‍हेशन्‍सच्‍या वैविध्‍यपूर्ण श्रेणीचा शोध घेण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत आणि त्‍यांना देशभरात सकारात्‍मक परितर्वनाला चालना देण्‍यासाठी आर्थिक साह्य करत आहोत.”

१०व्‍या पर्वाच्‍या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन ६ मार्च २०२५ रोजी मुंबईमध्‍ये करण्‍यात आले आहेत. या पर्वाच्‍या विजेत्‍यांना आर्थिक साह्यासोबत गुंतवणूकदार, कॉर्पोरेट प्रमुख व ग्रॅण्‍टमेकर्ससोबत नेटवर्क करण्‍यासाठी एमआयएफच्‍या इनोव्‍हेशन डे उपलब्‍धता मिळेल, जे त्‍यांना संभाव्‍य व्‍यवसाय संधी प्रदान करू शकतील. तसेच, प्रत्‍येक विजेत्याला पीआर व डिजिटल अॅम्‍प्‍लीफिकेशन आणि ‘जोश टॉक्‍स’ पॉडकॉस्‍टवर झळकण्‍याची संधी मिळेल; ‘जोश टॉक्‍स’ हा भारतभरात ३० दशलक्ष युजर्सचे सबस्‍क्रायबरवर्ग असलेला उद्योजकता व प्रेरणादायी भाषणांसाठी प्‍लॅटफॉर्म आहे. प्रत्‍येक विजेत्‍याला कार्यकारींच्‍या उपस्थितीत कथाकथन कलेमध्‍ये वैयक्तिकृत प्रशिक्षण आणि ६ समर्पित वन-ऑन-वन सत्रांमध्‍ये लीडरशीप प्रशिक्षण मिळेल. पात्र विजेत्‍यांना एमआयएफचा नो-इक्विटी अॅक्‍सेलरेटर प्रोग्राम ‘स्‍केल-अप’मध्‍ये देखील सामील होण्‍याची संधी मिळेल. तसेच, प्रत्‍येक विजेत्‍याला परिवर्तनाच्‍या कथांसाठी जगातील सर्वात मोठा सकारात्‍मक व सोल्यूशन-आधारित कन्‍टेन्‍ट-संचालित इम्‍पॅक्‍ट प्‍लॅटफॉर्म द बेटर इंडियासोबत सहयोगाने निर्मिती केलेल्‍या विशेष व्हिडिओमध्‍ये झळकण्‍याची संधी मिळेल.

मेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशन येथील गव्‍हर्निंग कौन्सिलचे अध्‍यक्ष आणि ज्‍युरी अध्‍यक्ष अमित चंद्रा म्‍हणाले, ”इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसचा परिवर्तनात्‍मक प्रभावासंदर्भात भारतीय इनोव्‍हेशन्‍सना प्रकाशझोतात आणण्‍याचा मनसुबा आहे. एमआयएफ या वैविध्‍यपूर्ण इनोव्‍हेशन्‍सच्‍या प्रवासामध्‍ये उत्‍प्रेरकाची भूमिका बजावते, जेथे जागरूकतेचा प्रसार करण्‍यासोबत त्‍यांच्‍या विकासाला साह्य करते.”

२०२२ मध्‍ये, इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसच्‍या ९व्‍या पर्वाला ७५० हून अधिक अर्ज मिळाले आणि सहा अपवादात्‍मक इनोव्‍हेशन्‍सना सन्‍मानित करण्‍यात आले. विजेत्‍यांमध्‍ये प्रतिष्ठित स्‍पेस टेक्‍नॉलॉजी कंपनी ध्रुव स्‍पेस, भारतातील कोविड-१८ लसीकरण उपक्रमाची डिजिटल आधारस्‍तंभ कोविन, एआय-पॉवर्ड वेस्‍ट सॉर्टिंग सोल्‍यूशन इशित्‍व रोबोटिक सिस्‍टम्‍स, ई-आयसीयूंसाठी कॉन्‍टॅक्‍टलेस रिमोट मॉनिटरिंग डिवाईस डॉझी आणि कम्‍युनिटी हेल्‍थ मॉनिटरिंगसाठी ई-हेल्‍थ प्‍लॅटफॉर्म खुशी बेबी यांचा समावेश होता. नऊ पर्वांदरम्‍यान इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डसने ६५ हून अधिक गेम-चेंजिंग इनोव्‍हेशन्‍सना सन्‍मानित केले आहे.

मेरिको इनोव्‍हेशन फाऊंडेशनच्‍या प्रमुख सुरंजना घोष म्‍हणाल्‍या, ”इनोव्‍हेशन फॉर इंडिया अवॉर्डस् उपक्रम इनोव्‍हेटर्सच्‍या पिढीला प्रेरित करणाऱ्या आणि देशभरात सकारात्‍मक परिवर्तनाचा लाभदायी प्रभाव निर्माण करणाऱ्या प्रभावी इनोव्‍हेशन्‍सना प्रकाशझोतात आणण्‍याप्रती कटिबद्ध आहे. ही कटिबद्धता देशामध्‍ये नाविन्‍यतेच्‍या संस्‍कृतीला चालना देण्‍याप्रती एमआयएफच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.”

लिंक्‍डइन व इन्‍स्‍टाग्रामवर #InnovationForIndiaAwards ला फॉलो करत नवीन बातम्‍यांबाबत अपडेट राहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments