Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा शाहा मुलांच्या किलबिलाटाने गजबजली. कोण रडत होते, तर कोणी हसत हसत शाळेत येत होते. कोणाला आईचा हात सोडायचा नव्हता तर कोण वर्गात मांडलेल्या मुक्त खेळावर खेळताना अगदी रंगून गेले होते.

डीईएसच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात मंगळावर दि. 18 जून रोजी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या गटातील पाच मुली स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महिला सुधारकांच्या वेशभुषेत अगदी शोभून दिसत होत्या. शाळेच्या आवारात लावलेले चित्ररूपी फलक आपल्या मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. फुलांच्या माळांनी पायघड्यांनी, फुग्यांनी शाळा अगदी सजली होती. शाळेच्या गेटवर चिंटू, मिनी सवागताला सज्ज होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता दाते यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments