18 महिन्यांचा व्हीईटी बाय ईएचएल स्वीस प्रोफेशनल डिप्लोमा हा स्वित्झर्लंडमधील प्रख्यात ईएचएल हॉस्पिटॅलिटी बिझनेस स्कूलचा अभ्यासक्रम आहे.
* अभ्यासक्रमाची सुरूवात एआयएसएसएमएस पुणे येथे 6 महिन्याच्या प्रशिक्षणाने होते.त्यानंतर ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट प्रोग्राम व ऑन जॉब ट्रेनिंगसाठी विविध शहरातील आयएचसीएल हॉटेल्समध्ये 12 महिन्यांचे प्रशिक्षण
* 12 वी पास किंवा पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकतात.
पुणे,19 जून 2024 : कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ने हाती घेतलेल्या भारतीय हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत स्वित्झर्लंडच्या ईएचएल हॉस्पिटॅलिटी बिझनेस स्कुलच्या सहकार्याने 18 महिन्यांचा व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (व्हीईटी) प्रोफेशनल डिप्लोमा अभ्यासक्रम दिला जात आहे.हा अभ्यासक्रम गेली दोन वर्षे यशस्वीरित्या सुरू असून 100 हून अधिक विद्यार्थी पदवीधर होऊन उद्योगात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यावर्षी व्हीईटी बाय ईएचएल एआयएसएसएमएस पुणे केंद्रामध्ये 100 हून अधिक आणि चंदीगड आणि बंगळुरू सह एकंदर 400 विद्यार्थी या उपक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत.या अभ्यासक्रमाचा कालावधी 18 महिने असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पेशलायझेशन क्षेत्रात सिध्दांत आणि व्यावहारिकतेचा योग्य आधार दिला जातो. एआयएसएसएमएसमधील प्रशिक्षणानंतर ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट प्रोग्राम आणि निवडक आयएचसीएल हॉटेल्समध्ये प्रशिक्षण (ऑन द जॉब ट्रेनिंग) दिले जाते.
कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे सल्लागार प्रवीण रॉय म्हणाले की,भारतातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात रोजगाराच्या संधींमध्ये 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. सीआयआयच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लि.(आयएचसीएल) सोबत धोरणात्मक करार आणि ईएचएल हॉस्पिटॅलिटी बिझनेस स्कुलच्या शैक्षणिक भागीदारीसह ईएचएल प्रमाणित प्रशिक्षकांच्या मदतीने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.हे प्रशिक्षक विभागप्रमुख देखील आहेत. हा अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने उद्योगाकडून उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी आहे.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नियोक्त्यांना उद्योगाच्या अपेक्षांप्रमाणे मनुष्यबळ मिळत नाही.जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यावसायिक प्रशिक्षणाची आणि त्या माध्यमातून आदरातिथ्य क्षेत्रात प्रतिभावान व्यावसायिक निर्माण होऊ शकतील,याची भारतात निश्चित गरज आहे.व्हीईटी बाय ईएचएल अभ्यासक्रमाद्वारे ही कौशल्यातील दरी भरून काढण्यास मदत होत असून जागतिक आदरातिथ्य क्षेत्रात रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माता म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल.केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील हॉटेल्स, एअरलाईन्स, क्रुझलाईन्स,केटरिंग व पर्यटन उद्योगासह आदरातिथ्य क्षेत्रात तरूणांना जागतिक प्रशिक्षण दिले जाईल.
हॉस्पिटॅलिटी एज्युकेशनमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या व 25 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध लिहिलेल्या आणि एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नोलॉजी पुणेच्या प्राचार्य डॉ.सोनाली जाधव म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून व्हीईटी बाय ईएचएल अभ्यासक्रम आम्ही राबवत आहोत. अभ्यासक्रमातील विषय हे उद्योगातील सद्यस्थितीशी सुसंगत आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण होताच उद्योगात सामील होण्यासाठी आणि या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थी सज्ज होतील.या अभ्यासक्रमासाठी एआयएसएसएमएस, आयएचसीएल,सीआयआय व इकोल हॉटेल द लुसॅन (ईएचएल) सह चार भागीदार आहेत.
ईएचएलचे क्षेत्रीय प्रमुख (दक्षिण आशिया,मध्यपूर्व व म्यानमार) व संचालक अमन आदित्य सचदेव म्हणाले की, व्हीईटी बाय ईएचएल हा अभ्यासक्रम जगप्रसिद्ध स्वीस कॉम्पिटन्सी फ्रेमवर्कच्या तत्त्वांवर आधारित आहे.ईएचएल मधील विषयतज्ञ,प्राध्यापकांच्या सहभागासह तसेच जागतिक उद्योगाच्या अभिप्रायासह हा उपक्रम दोन वर्षाच्या कालावधीत विकसित केला गेला आहे. जगभरातील तरूणांना हॉस्पिटॅलिटी उद्योगात जागतिक मानकांनुसार रोजगार कार्यक्षम करणे हा यामागचा उद्देश्य आहे.भारतातील या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भविष्यातील नियोक्ता, जागतिक गतिशीलता आणि करिअरमधील प्रगतीचा विचार करण्याकरिता फायदेशीर आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या बरोबरीने उदयोगांना आवश्यक असलेले संबंधित ज्ञान आणि क्षमता या माध्यमातून विद्यार्थी प्राप्त करतील. सीआयआय सोबत भागीदारीद्वारे संपूर्ण भारतात व्हीईटी बाय ईएचएलचा विस्तार पाहून आम्हाला आनंद होत आहे.पुण्यातील एआयएसएसएमएस,कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नोलॉजीमध्ये सुरू असलेला हा अभ्यासक्रम हॉस्पिटॅलिटी आणि संबंधित सेवा उदयोगांमध्ये शाश्वत रोजगारासाठी भारतातील तरूणांच्या कौशल्याप्रती सीआयआय, आयएचसीएल हॉटेल्स आणि ईएचएल यांच्या सामूहिक वचनबध्दतेचे प्रतिक आहे.
हा अभ्यासक्रम उद्योगासोबतच्या भागीदारीतील एक अनोखे प्रशिक्षण प्रारूप आहे, ज्यातील काही भागाचा समावेश एआयएसएसएमएस, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नोलॉजी आणि उर्वरित आयएचसीएल हॉटेल्समध्ये आहे. उद्योगातील तज्ञांच्या मदतीने उदयोगासाठी रोजगार कार्यक्षम मनुष्यबळ तयार केले जाते. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झाला असून सुमारे 100 विद्यार्थी उद्योगात सामील झाले आहेत व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नोलॉजी, पुणे,2024 बॅचच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सज्ज आहे.


