Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedलष्कर वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी*

लष्कर वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी*

*
पुणे, दि. १९: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील लष्कर वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार महात्मा गांधी रस्ता, कॅम्प येथील वाय जंक्शन ते ट्रायलक हॉटेल चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व तसेच पश्चिम दिशा नो पार्किंग, वाय जंक्शन ते १५ ऑगस्ट चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व बाजूस नो पार्किंग, रस्त्याच्या पश्चिम बाजूस सिरीयल माता मेढी मंदीर ते १७४, रेडीएंट स्पॉट व शॉप नं.१ पर्यंत दुचाकी पार्किंग, १७४, रेडीएंट स्पॉट, शॉप नंबर १ पासून पुढे १८२ व जय अम्बे मोटर्स या दुकानापर्यंत चारचाकी वाहनांसाठी अॅग्युलर पार्कीग करण्यात येत आहे.

१५ ऑगस्ट चौक ते महमंद रफी चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व बाजुस १४०, महात्मा गांधी रस्त्यावरील हेमा फ्लोवर्स दुकान ते ९५, प्लेटेनियम लायटनिंग या दुकानापर्यंत तसेच रस्त्याच्या पश्चिम बाजूस १८५, चौधरी असोसिएटस, महात्मा गांधी रस्ता ते महमंद रफी चौक (एसबीआय,एटीएम) पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहनासाठी पार्किंग करण्यात येत आहे.

महमंद रफी चौक (एसबीआय, एटीएम) ते कोहीनूर हॉटेल रस्त्याच्या पश्चिम बाजूस २४१, बिल्लीमोरीया कॉस्मेटिक अॅन्ड लेडीज टेलर, कॅम्प या शॉपपर्यंत तसेच पूर्वबाजूस ९३, शमुन्स फ्लॉवर्स, महात्मा गांधी रस्ता, कॅम्प ते ३७, महात्मा गांधी रस्ता, महावीर चौकाजवळील पूर्वबाजूचे बाटा शोरुमपर्यंत व कोहीनूर हॉटेल चौक ते महावीर चौकापर्यत पश्चिम बाजूस २४५/४६, महात्मा गांधी रस्त्यावरील प्रिया हॉटेल ते २८५, डीनोव्हो क्लोथ मार्टपर्यंत सम विषम तारखेस आलटून पालटुन एका बाजूस दुचाकी तर दुसऱ्या बाजुस अॅग्युलर चारचाकी वाहनाचे पार्किंग करण्यात येत आहे.

महावीर चौक ते नाझ चौकापर्यंत पश्चिम बाजूस २९०, कॅन्टाबिल, महात्मा गांधी रस्त्यावरील ६, सारेगामा म्युझिकल शॉपपर्यंत तसेच पूर्व बाजूस ३१/३२, बैंक ऑफ बडोदा ते २७, आदिदास क्लोथ शॉप पर्यंत सम विषम तारखेस आलटून पालटुन एका बाजुस दुचाकी तर दुसऱ्या बाजुस चारचाकी वाहनासाठी अॅंग्युलर पार्किंग करण्यात येत आहे.

नाझ चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोलेदिना रस्त्यावर रस्त्याच्या पश्चिम बाजूस शॉप नंबर ५, अलाईस इन जॅलेटो लॅन्ड, अरोरा टॉवर बिल्डिंग, कॅम्प ते शॉप नंबर ९ कराची स्वीट मार्ट, अरोरा टॉवर बिल्डिंग, कॅम्प पर्यंत तसेच पूर्व बाजूस शॉप नंबर ११, मॅजेस्टीक परफ्युम अँड अॅपरीयल्स स्टर्लिंग सेंटर बिल्डिंग, कॅम्प ते शॉप नंबर २, बगीचा कॉर्नर पर्यंत दुचाकी वाहनांसाठी पार्किंग करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ३ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments