Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिशलिनकडून भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम कमर्शियल वेईकल टायर: मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+...

मिशलिनकडून भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम कमर्शियल वेईकल टायर: मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+ लाँच

जवळपास १५ टक्‍के इंधन बचत, फ्लीट ऑपरेटर्स जवळपास ३ लाख रूपयांची* बचत करू शकतात

 

l समकालीन ट्यूब टायर्सच्‍या तुलनेत २० टक्‍के* अधिक टायर लाइफ

 

 

 

India, June 24, 2024: मिशलिन या जगातील टायर तंत्रज्ञान अग्रणी कंपनीने आज भारतातील बाजारपेठेसाठी त्‍यांचा सर्वात इंधन-कार्यक्षम ट्रक आणि बस टायर ‘एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+’च्‍या लाँचची घोषणा केली. मेड-इन-इंडिया टायरची ही नवीन श्रेणी विशेषत: भारतीय रस्‍ते व लोड स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे आणि भारतीय ताफा मालकांकडून इंधन-कार्यक्षम टायर्ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याचा देखील प्रयत्‍न करते.

 

मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+ टायर तंत्रज्ञानामधील मोठ्या प्रगतीला सादर करतो. या टायरमध्‍ये उद्योगातील सर्वात कमी रोलिंग रेसिस्‍टण्‍स आहे, जे जवळपास १५ टक्‍के* इंधन बचत देते. २९५/८०आर२२.५ आकार असलेला हा ट्यूबलेस ट्रक टायर प्रख्‍यात मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेडचे अपग्रेडेड व्‍हर्जन आहे आणि कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन जवळपास ८ टनने कमी करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे**.

 

”२०२० मध्‍ये सुरूवातीला मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड श्रेणीच्‍या यशस्‍वी लाँचनंतर आम्‍हाला भारतातील ग्राहकांसाठी नेक्‍स्‍ट जनरेशन मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+ श्रेणी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे,” असे मिशलिन इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक शंतनू देशपांडे म्‍हणाले. ”मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+ लॉजिस्टिक्‍समधील उच्‍च इंधन खर्चांच्‍या प्रमुख समस्‍येचे निराकरण करतो, जो सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देत आणि एकूण खर्च कमी करत ताफा मालकांच्‍या जवळपास ६० टक्‍के ऑपरेटिंग खर्चांप्रती योगदान देतो.”

 

मिशलिन शाश्‍वत भविष्‍य आणि तंत्रज्ञानामधील प्रगतीला प्राधान्‍य देते. पर्यावरणाचे जतन ही मिशलिनची दीर्घकालीन कटिबद्धता असण्‍यासह त्‍यांच्‍या पाच मुलभूत मूल्‍यांपैकी एक आहे. ३० वर्षांपासून ग्रुपने आपली पर्यावरणीय फूटप्रिंट कमी करण्‍याप्रती उत्‍सुकता, तसेच कमी प्रभावासह मोठ्या प्रमाणात नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने, सेवा व सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याची क्षमता दाखवली आहे. टायर्ससंदर्भात मिशलिनने ‘ग्रीन’ टायरच्‍या लाँचसह १९९२ पासून मार्ग दाखवला आहे. कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन जवळपास ८ टनने** कमी करण्‍यास मदत करण्‍याची अपेक्षा असलेला मिशलिन एक्‍स मल्‍टी एनर्जी झेड+ मिशलिन ग्रुपच्‍या २०३० पर्यंत कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन कमी करण्‍याच्‍या कटिबद्धतेप्रती मोठ्या प्रमाणात योगदान दे

ईल.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments