Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील सर्व पब हद्दपार करा -धीरज घाटे

पुण्यातील सर्व पब हद्दपार करा -धीरज घाटे

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे निवेदन

1. पुण्यात सुरू असलेले सर्व पब हद्दपार करण्याचा निर्णय राज्य शासनाने तातडीने घ्यावा
2. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांनी तातडीने पब ची अधिकृत नियमावली आणि शहर आणि जिल्ह्यातील अधिकृत पब ची यादी प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी
3. अनधिकृतपणे व्यवसाय करत असलेल्या पब वर उद्यापासून भारतीय जनता पार्टी पुणे चे कार्यकर्ते आमच्या पद्धतीने अँक्शन घेतील
4. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांची रचना केली असून उद्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल हा सर्व अनधिकृत पब व्यवसायिकांना इशारा आहे
5. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गणेशोत्सवामध्ये रात्री दहा वाजता स्पीकर बंद केले जातात त्याच धर्तीवर रात्री 10 नंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व पबमधील स्पीकर बंद करावेत .
6. पब संदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी
7. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात यावे.
8. रात्रीच्या वेळी वेगाने गाड्या चालवणारे , अश्लील जाळे करणारे आणि आरडाओरडा करून परिसरात अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी
9. शहरातील ड्रग्जची विक्री, आणि इतर ऍक्टिव्हिटीज थांबविण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले याची माहिती द्यावी
10. नागरिकांना अवैध धंद्यांची माहिती देता यावी यासाठी हेल्पलाइन सुरू करावी
11. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे त्या संदर्भात आमच्याकडे महत्वपूर्ण माहिती आली असून लवकरच गुटखे विक्रेत्यांचा आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्यांचा पर्दाफाश केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments