*दिनांक 25 जून 2024.*
अन्याय होत असेल तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं गैर नाही. एखाद्या घरातील एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबावर जर आघात येत असेल तर राज्याच्या प्रमुखकांकडे दाद मागणं गैर नाही. पण एखादे कुटुंबच संपूर्ण दोषात सहभागी असेल तर त्यांना माफ करणे खूपच चुकीचा आहे. पुणे हितेंद्र कार अपघात प्रकरणी अगरवाल कुटुंब संपूर्णपणे दोषी आहे आणि त्यांनी तो गुन्हा जाणीवपूर्वक केलेला आहे जाणीवपूर्वक केलेला गुन्हा त्यामध्ये कोट्यावधी रुपयाची आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे म्हणजे त्यांनी भ्रष्टाचाराला देखील खतपाणी घातलेलं आणि देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांना माफी करणे तर सोडा मुख्यमंत्र्यांनी कॅबिनमध्ये देखील बोलायला नाही पाहिजे, मात्र मुख्यमंत्र्यांनी दस्तूर खुद्द त्यांना चर्चेला बोलवून त्यांच्यासोबत फोटो आणि शूटिंग काढतात, त्या पेपरला बातमी देतात म्हणजे हा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जखमांवर मीठ चोळल्यासारखा आहे आणि पुण्याच्या त्या हितेंद्रन प्रकरणी नाहक बळी गेलेल्या त्या दोन्ही मुलांवर, त्यांच्या कुटुंबावर किती भयंकर अन्याय आहे याची कल्पना न केलेली बरी, असा मुख्यमंत्री इतका कर्तबगार मुख्यमंत्री मी अद्याप पाहिलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
आणि दुसरीकडे..
शेतकरी कष्टकरी कामगार मंत्रालयामध्ये मंत्र्यांना किंवा त्यांच्या कामकाजासाठी भेटायला गेले तर त्यांची जेवणाचा डबा, पाण्याची बाटली काढून घेतली जाते! त्यांची औषधाची पुडी काढून घेतली जाते त्यांच्याकडे असले नसलेले साहित्य काढून घेतलं जातं, कागदपत्र खालीवर करून तपासले जातात नव्हे नव्हे शेतकरी व इतर संघटनांचे पदाधिकारी यांच्या छातीला लावलेले ब्याच – बिल्ला काढून घेण्याची हिंमत देखील त्या मंत्रालयाच्या गेटवर, हरामखोर राज्यकर्त्यांच्यामुळे मंत्रालयाच्या गेटवर अत्यंत शर्मेनी मान खाली जाईल इतकी चेकिंग नको तिथे हात लावून, पुरुषालाही लाज्ज येईल अशी चेकिंग केली जाते, म्हणजे राज्यातले शेतकरी कष्टकरी कामगार न्याय हक्कासाठी ज्यावेळेस मंत्रालयात येतात त्यावेळेस ते देशद्रोही किंवा आरोपी असल्यासारखी त्यांना वागणूक दिली जाते याचा मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब, खूनी आणि खूनात सहभागी आणि खुनाचा प्रयत्न मिटवणाऱ्या, आर्थिक भ्रष्टाचार ते देशद्रोही कृत्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री वेळ देतात आश्चर्य आहे म्हणजे जिकडे पैसा तिकडे सत्ता झोपते हे रावसाहेब दानवे पाटील यांचं म्हणणं सत्य आहे का.? आणि शेतकरी कष्टकऱ्यांवरती आणि संघटनेवर महाराष्ट्र सरकारच्या गेटवर घोर अन्याय होतो हे या शेतकरी मुख्यमंत्र्यांना कसं होतं.!
*”ज्यांनी खून केले त्यांना भेटायला मुख्यमंत्री वेळ देतात*
*मात्र महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.?,,*
“मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी किंवा शेतकरी दररोज आत्महत्या करतोय त्यांच्या निराकरण करण्यासाठी न्यायालयाचे, राज्य अन्न आयोगाचे आदेश आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी, संघटनेने व याचिका करते म्हणून मी स्वतः राज्य आणि राष्ट्रीय किसान संघटन प्रमुख म्हणून गेल्या सात महिन्यापासून वेळ मागूनही मुख्यमंत्र्यांना नवे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गेल्या तीन-चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांच्या साडेबावीस हजार आत्महत्या होऊन देखीलवेळ शेतकरी आत्महत्या चे निराकरण करण्यासाठी वेळ मिळत नाही.!!
आणि
पैसेवाल्या बिल्डर कुटुंबीयांना मात्र वेळ दिला.
म्हणून जिथे पैसा तिथे सत्ता वाकते, झुकते बी, हे रावसाहेब पाटील दानवे यांचे म्हणणे सत्य आहे, दानवे पाटील म्हणतात सत्तेसाठी वाकून आलेली झुकलेली आणि झोपले बी, हे खरं आहे.! दाल मी काल नाही सर, पुरी दाल काली आहे.


