Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार उद्योजक कन्हैया दुबे यांना जाहीर स्वराज्य...

सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार उद्योजक कन्हैया दुबे यांना जाहीर स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

 

पुणे: सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा कृषिरत्न पुरस्कार पुण्याचे कात्रज येथील रहिवासी कन्हैया दुबे यांना जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कन्हैया दुबे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

सद्गुरु शंकर महाराज मठाचे दुबे हे माजी विश्वस्त आहेत. समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग क्षेत्रात कन्हैया दुबे कार्यरत आहेत. सोमवार, दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरमधील सावेडी रोड, माऊली संकुल सभागृहात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. सन्मान सोहळा सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शुभहस्ते दुबे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यातील यशस्वी शेतकरी आणि शेतीतून उद्योग निर्माण करणारे उद्योजक यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

कन्हैया दुबे यांनी नामवंत इन्स्टिट्युट ने रिसर्च केलेले गांडुळखत यावर पूर्ण मेहनत घेऊन हा ५ राज्यातील पहिला प्रकल्प सासवड येथे उभा केला आणि गांडुळखतात नाविन्य पूर्ण असे संशोधन करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून पहिल्याच वर्षी आपल्या उत्पादनात आणि उत्पन्नात कशी वाढ करावी हे यशस्वी कार्य करून दाखवले आहे. तसेच भारतात नव्हे तर जगात पहिल्यांदा गांडुळखत पासून निर्माण केलेले व्हर्मी कुकीज, व्हर्मी स्टिक , आणि व्हर्मी बीन्स असे वेगवेगळे उत्पादन इनडोअर आणि आऊट डोअर प्लांटससाठी निर्माण केले आहे

 

सावित्रीबाई फुले विद्यापीठ ( पुणे युनिव्हर्सिटी ) यांच्या माध्यमातून सुध्दा शेती आणि शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना खत, औषधे, बियाणे, खात्रीशीर कसे वापरावे आणि नियोजनबद्ध शेती कशी करावी आणि सेंद्रिय खताच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन कसे करावे यासाठी कन्हैया दुबे शेतकऱ्यांना जिल्हा आणि तालुका पातळीवर मार्गदर्शन करता

त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments