राष्ट्रीय, 3 जुलै 2024: जगातील अग्रेसर ग्राहक आरोग्य आणि हायजिन कंपनी रेकिट ने नवीन माता आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी आपल्या सेल्फ केअर उपक्रमाच्या माध्यमातून,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘स्टॉप डायरिया मोहिमे’ मध्ये सहभाग घेतला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्री जे.पी. नड्डा यांनी गेल्या आठवड्यात सुरू केलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट भारतात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखणे हे आहे.अनेक राज्यांमध्ये, बालपणातील अतिसाराचे आजार हे पाच वर्षांपेक्षा लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, रेकिट या उपक्रमाद्वारे प्लॅन इंडियाच्या भागीदारीत – नवीन माता आणि पाच वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी स्वत:ची काळजी, ओआरएस आणि झिंकचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व सहा टप्प्यांमधुन सांगण्यात येत आहे.दोन महिन्यांची ही मोहिम महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये हात धूण्याचे महत्व, ओआरएस प्रात्यक्षिके, समाजाचा सहभाग, सक्रिय उपाय, आणि अत्यावश्यक अतिसार किटचे वितरण या माध्यमातून समाजातील सदस्यांना याबाबत शिक्षण देण्यावर भर देणार आहे.


