Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या महाराष्‍ट्रातील सी एस आर प्रकल्‍पांचे श्री. गिरीश महाजन,...

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या महाराष्‍ट्रातील सी एस आर प्रकल्‍पांचे श्री. गिरीश महाजन, ग्रामीण विकास मंत्री, महाराष्‍ट्र सरकार यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

मुंबई । जुलै ४, २०२४ – ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एच एम आय एफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एच एम आय एल)च्‍या सी एस आर शाखेने महाराष्‍ट्रात कला, आरोग्‍य व स्‍वच्‍छता क्षेत्रांमध्‍ये विविध कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांच्‍या शुभारंभाची घोषणा केली आहे. मुंबईतील बॉम्‍बे आर्ट सोसायटी येथे श्री. गिरीश महाजन, ग्रामीण विकास व युवा व्‍यवहार आणि क्रीडा मंत्री, महाराष्‍ट्र सरकार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमांचे उद्घाटन करण्‍यात आले.

उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या प्रकल्‍पांमध्‍ये एच एम आय एफ च्‍या प्रमुख ‘आर्ट फॉर होप’ उपक्रमाच्‍या तिसऱ्या सीझनअंतर्गत २-दिवसीय सांस्‍कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘आर्ट फॉर होप’ उपक्रम भारतभरातील १० विकलांग अनुदान प्राप्‍तकर्त्यांना सन्‍मानित करतो. तसेच, श्री. गिरीश महाजन यांच्‍या हस्‍ते ५ टेलिमेडिसीन क्लिनिक्‍सचे अनावरण करण्‍यात आले आणि स्‍पर्श संजीवनी प्रकल्‍पांतर्गत २ मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍सना हिरवा झेंडा दाखवण्‍यात आला. याव्‍यतिरिक्‍त, प्रकल्‍प ‘H₂OPE’ चा भाग म्‍हणून गडचिरोलीमधील १०० शाळांमध्‍ये १०० वॉटर आर ओ सिस्‍टम्‍सचे व्‍हर्च्‍युअली अनावरण करण्‍यात आले, ज्‍यामागे सर्वांसाठी पिण्‍यासाठी शुद्ध पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे.

 

सी एस आर उपक्रमांच्‍या उद्घाटनीय समारोहादरम्‍यान मत व्‍यक्‍त करत श्री. गिरीश महाजन, ग्रामीण विकास व युवा व्‍यवहार आणि क्रीडा मंत्री, महाराष्‍ट्र सरकार म्‍हणाले, ”मी एच एम आय एफ चे या बहुमूल्‍य सी एस आर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून नागरिकांचे जीवन सुधारण्‍याप्रती कटिबद्धतेसाठी कौतुक करतो. टेलिमेडिसीन क्लिनिक्‍स, मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍स आणि वॉटर आरओ सिस्‍टम्‍स संपूर्ण महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात योग्‍य आरोग्‍यसेवा व स्‍वच्‍छता उपलब्‍ध करून देतील. आम्‍ही अशा सहयोगात्‍मक प्रयत्‍नांचे कौतुक करतो, जे खरेतर शाश्‍वत विकास ध्‍येये संपादित करण्‍यासाठी आवश्‍यक आहेत.”

 

सी एस आर उपक्रमांच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एम डी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सी ई ओ) श्री. उन्‍सू किम म्‍हणाले, ”ह्युंदाईमध्‍ये आमचा क्रिएटिंग शेअर्ड व्‍हॅल्‍यू आणि आम्‍ही सेवा देत असलेल्‍या समुदायांमध्‍ये सकारात्‍मक परिवर्तनाला चालना देण्‍यावर विश्‍वास आहे. ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी बांधील राहत ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन अनेक प्रभावी सी एस आर उपक्रमांच्‍या अग्रस्‍थानी आहे, ज्‍यांचा समाजात सकारात्‍मक परिवर्तनाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. महाराष्‍ट्रातील आमच्‍या नवीन सी एस आर उपक्रमांमधून सर्वसमावेशक विकास आणि समुदाय विकासाप्रती एच एम आय एफ ची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही विकलांग व्‍यक्‍तींना पाठिंबा देण्‍यासह आरोग्‍यसेवा उपलब्‍धता वाढवण्‍याप्रती आणि समाजाच्‍या एकूण कल्‍याणामध्‍ये सुधारणा करण्‍याप्रती समर्पित आहोत.”

 

आर्ट फॉर होप – सीझन ३:

 

आता तिसऱ्या सीझनमध्‍ये असलेला ‘आर्ट फॉर होप’ हा एच एम आय एफ च्‍या सर्वसमावेशक कला उपक्रमांतर्गत प्रमुख उपक्रम आहे. बॉम्‍बे आर्ट सोसायटी येथे दोन-दिवसीय प्रदर्शनामध्‍ये १० विशेष विकलांग आर्टिस्‍ट्सच्‍या कलाकृतींना दाखवले जाते, ज्‍यांना या उपक्रमांतर्गत अनुदान मिळते. हे प्रदर्शन मार्च २०२४ मध्‍ये त्रिवेणी कला संगम, नवी दिल्‍ली येथील ४० अनुदान विजेत्‍यांच्‍या प्रकल्‍पांच्‍या प्रदर्शनाचे विस्‍तारीकरण आहे. अनुदानांव्‍यतिरिक्‍त चेन्‍नई, मुंबई, गाजियाबाद, बेंगळुरू व नोएडा येथील १० आर्टिस्‍ट्स यांचे त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्ससोबत सॉफ्ट स्किल्‍स, कला व्‍यवस्‍थापन आणि वैयक्तिक ब्रँडिंगमध्‍ये व्‍हर्च्‍युअल अपस्किलिंग प्रशिक्षण घेतले जाते. या उपक्रमाचा आर्टिस्‍ट्सना ह्युंदाईच्‍या समर्थ उपक्रमाशी बांधील राहत शाश्‍वत, सर्वसमावेशक आणि निष्‍पक्ष उत्‍पन्‍न संधी देत सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

 

५ टेलिमेडिसीन क्लिनिक्‍सची स्‍थापना आणि २ मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍स तैनात:

 

आरोग्‍यसेवा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये एच एम आय एफ ने महाराष्‍ट्राच्‍या वंचित भागांमध्‍ये ५ टेलि‍मेडिसीन क्लिनिक्‍स स्‍थापित केले आहेत, ज्‍यांचा तळेगाव जिल्ह्यातील पैत, काडूस, वाडा, नावलक, उंबरे आणि सुदुंबरे या गावांमधील व्‍यक्‍तींना फायदा होईल. हे क्लिनिक्‍स दुरून आवश्‍यक वैद्यकीय सल्‍लामसलत व आरोग्‍यसेवा देतील, ज्‍यामुळे आरोग्‍यसेवा प्रदाते आणि दुर्गम प्रदेशांतील रूग्‍ण यांच्‍यामधील तफावत दूर होईल. यासह, एच एम आय एफ भारतभरात ४० टेलि‍मेडिसीन युनिट्स ऑपरेट करेल, जेथे ही आकडेवारी देशभरात ५० युनिट्सपर्यंत घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे.

 

एच एम आय एफ ने नागपूर व औरंगाबादच्‍या दुर्गम आणि वंचित भागांमध्‍ये वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी आवश्‍यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्‍ज २ सानुकूल मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍स देखील सादर केल्‍या आहेत. ज्‍यामुळे प्रत्‍यक्ष गरजू रूग्‍णांना निदान व उपचार सेवा उपलब्‍ध होतील. सहयोगाने, टेलि‍मेडिसीन क्लिनिक्‍स आणि मेडिकल व्‍हॅन्‍स जिल्‍ह्यातील १ दशलक्षहून अधिक ग्रामीण व्‍यक्‍तींच्‍या वैद्यकीय गरजांची पूर्तता करतील.

 

शाळांमध्‍ये १०० वॉटर आर ओ सिस्‍टम्‍स बसवण्‍यात आल्‍या:

 

विद्यार्थ्‍यांना शुद्ध पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये एच एम आय एफ ने महाराष्‍ट्रातील वन जिल्‍हा गडचिरोलीमधील १०० शाळांमध्‍ये १०० आर ओ प्‍लांट्स बसवले आहेत. या उपक्रमाचा विद्यार्थ्‍याना सर्वोत्तम आरोग्‍य व स्‍वच्‍छतेबाबत प्रेरित करण्‍याचा, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्‍याप्रती योगदान देण्‍याचा मनसुबा आहे. या प्रकल्‍पाचा प्रांतातील ३५,००० शालेय विद्यार्थ्‍यांना फायदा होईल.

 

हे उपक्रम युनायटेड नेशन सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट गोल्‍स (एस डी जी) प्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्‍याच्‍या एच एम आय एफ च्‍या व्‍यापक धोरणाचा भाग आहेत, तसेच ह्युंदाई मोटर कंपनीचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी संलग्‍न आहे. या प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून एच एम आय एफ आपला सामाजिक जबाबदारी व समुदाय विकासाचा वारसा अ

धिक दृढ करत आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments