Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर 'बीस्‍पोक एआय डेज' ऑफर्स लाँच गुरूग्राम, भारत...

सॅमसंगकडून एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर ‘बीस्‍पोक एआय डेज’ ऑफर्स लाँच गुरूग्राम, भारत – ५ जुलै २०२४: सॅमसंग या भारतातील

गुरूग्राम, भारत – ५ जुलै २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज आपल्‍या बीस्‍पोक एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या श्रेणीवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली. या ऑफर्ससह सॅमसंगचा एआयचे लोकशाहीकरण करण्‍याचा आणि ग्राहकांसाठी कंपनीचे डिजिटल अप्‍लायन्‍सेस सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. सॅमसंगची बीस्‍पोक अप्‍लायन्‍सेसची नवीन श्रेणी टास्‍क्‍स सुव्यवस्थित करण्‍यासाठी एआयचा समावेश करत स्‍मार्ट राहणीमान देते, ज्‍यामुळे वापरकर्ते जीवनात उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेऊ शकतात, जे ‘डू लेस, लिव्‍ह मोअर’ या तत्त्वाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे.

 

५ जुलैपासून पुढील १० दिवसांसाठी ग्राहक एआय-संचालित राहणीमानाच्‍या फायद्यांना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासाठी विशेष ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. हे बीस्‍पोक एआय-पॉवर्ड अप्‍लायन्‍सेस वापरकर्त्‍यांना सेटिंग्‍ज वैयक्तिकृत करण्‍यास सक्षम करतात, सर्व वयोगटातील ग्राहकांना युजर-अनुकूल कंट्रोल्‍स देतात आणि सानुकूल कार्यक्षमतेसाठी त्‍वरित निदान देतात.

 

”बीस्‍पोक एआयसह, सॅमसंगने भारतीय ग्राहकांना प्रीमियम जागतिक तंत्रज्ञान उपलब्‍ध करून दिले आहे. हे होम अप्‍लायन्‍सेस सर्व ग्राहकांना सानुकूल पर्याय, सुलभ नियंत्रण, अद्वितीय सोयीसुविधा, ऊर्जा कार्यक्षमता आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञान देतात. ‘बीस्‍पोक एआय डेज’ ऑफर्सच्‍या माध्‍यमातून आमचा होम अप्‍लायन्‍सेसच्‍या प्रीमियम विभागामध्‍ये अपग्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांना आकर्षक कॅशबॅक्‍स आणि झीरो डाऊन पेमेंट सेवा देण्‍याचा मनसुबा आहे. ही लिमिटेड-पीरियड ऑफर एआय अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देते, ज्‍यामुळे ग्राहक ‘डू लेस अँड लिव्‍ह मोअर’चा आनंद घेऊ शकतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसचे वरिष्‍ठ संचालक सौरभ बैशाखिया म्‍हणाले.

 

आधुनिक भारतीय कुटुंबांना स्‍मार्ट होम्‍स तयार करण्‍याच्‍या सुविधा मिळत असताना सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या श्रेणीवरील आकर्षक ऑफर्स ५ जुलै ते १४ जुलै २०२४ पर्यंत लागू आहेत. ‘बीस्‍पोक एआय डेज’ ऑफर्स Samsung.com, आघाडीचे रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर लागू असतील. ज्‍यामुळे देशभरातील ग्राहकांना सोयीसुविधेची खात्री मिळेल.

 

‘बीस्‍पोक एआय डेज’दरम्‍यान सॅमसंगचे एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणारे ग्राहक जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि झीरो डाऊन पेमेंट अशा मोठ्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. ग्राहकांना एआय-पॉवर्ड इकोबबल वॉशिंग मशिन मॉडेल्‍सवर ९००० रूपये कॅशबॅक मिळू शकते, तर बीस्‍पोक एआय मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन १२,००० रूपयांच्‍या कॅशबॅकसह येतो.

 

‘बीस्‍पोक एआय डेज’ ऑफर्स पुढील अप्‍लायन्‍सेसवर देखील उपलब्‍ध आहेत:

 

एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स – ४ डोअर बीस्‍पोक एआय फॅमिली हब+, ४ डोअर बीस्‍पोक एआय कन्‍वर्टिबल फ्रेंच डोअर, ४ डोअर एआय कन्‍वर्टिबल फ्रेंच डोअर

 

एआय-पॉवर्ड वॉशिंग मशिन्‍स – एआय इकोबबल फ्रण्‍ट लोड आणि इकोबबल टॉप लोड

 

एआय-पॉवर्ड विंडफ्री एअर कंडिशनर्स

 

निवडक बीस्‍पोक एआय मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍स

 

सॅमसंगच्‍या एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्समध्‍ये एआय व्हिजन कॅमेरा आहे, जो सुरूवातीच्‍या जवळपास ३३ खाद्यपदार्थांना ओळखण्‍यास मदत करतो. रेफ्रिजरेटर त्‍याच्‍यामधील स्क्रिन्‍सच्‍या माध्‍यमातून लंच किंवा डिनरसाठी स्‍टोअर केलेल्‍या फूड सामग्रीवरून काय कूक करावे याबाबत सल्‍ला देतो. तसेच, स्‍मार्ट फूड मॅनेजमेंट सिस्‍टमसह वापरकर्त्‍यांना रेफ्रिजरेटरमध्‍ये स्‍टोअर केलेले विशिष्‍ट खाद्यपदार्थ केव्‍हा नाशवंत होतील याबाबत समजू शकते.

 

एआय-पॉवर्ड इकोबबल वॉशिंग मशिन मॉडेल्‍स एआय कंट्रोलसह येतात, जे वापरकर्त्‍यांच्‍या लाँड्री रूटिन्‍स जाणून घेत त्‍याच्‍याशी जुळून जाते, अधिक कार्यक्षमता व सोयीसुविधेसाठी वॉश चक्र ऑप्टिमाइज करते. तसेच, एआय वॉश वैशिष्‍ट्य धुतले जाणाऱ्या कपड्यांचे वजन, फॅब्रिक्‍सचा प्रकार व त्‍यांचा सॉफ्टनेस, वॉटर लेव्‍हल, सॉइलिंग लेव्‍हल व डिटर्जंट लेव्‍हल ओळखते आणि त्‍यानुसार सानुकूल वॉश चक्र तयार करते. याव्‍यतिरिक्‍त, वॉशिंग मशिन्‍समध्‍ये ४५ टक्‍के केअर फॅब्रिक टेक्‍नॉलॉजी देखील आहे, जी सौम्‍य, पण प्रभावी क्‍लीनिंग देत कपड्यांचा टिकाऊपणा वाढवते.

 

सॅमसंगचे नवीन एआय-पॉवर्ड एअर कंडिशनर्स देखील वेलकम कूलिंग फंक्शनसह येतात. या फंक्‍शनच्‍या माध्‍यमातून वापरकर्ते घरापासून दूर असताना देखील घरामध्‍ये थंडावा निर्माण करू शकतात. तसेच, एआय जिओ फेन्सिंग वापरकर्त्‍यांना कमांड्स सेट करण्‍याची सुविधा देते आणि स्‍मार्टथिंग्‍ज अॅप्‍लीकेशन तुम्‍ही घरापासून विशिष्‍ट अंतरावर असताना किंवा घरापासून दूर जात असताना (विशिष्‍ट रेंज १५० मीटर ते ३० किलोमीटरपर्यंत आहे) अप्‍लायन्‍सेस चालू किंवा बंद करण्‍याचे नोटिफिकेशन पाठवते.

 

वापरण्‍याच्‍या पद्धतींनुसार एआय अल्‍गोरिदमचा वापर करत सानुकूल ऊर्जा बचत करणाऱ्या पद्धतीसह सॅमसंग डिवाईसेसमधील एआय पॉवर मोड ऊर्जा कार्यक्षमतेला प्राधान्‍य देण्‍यासाठी इंटे‍लिजण्‍टली परफॉर्मन्‍स सेटिंग्‍ज समायोजित करते, ज्‍यामुळे रेफ्रिजरेटर्समध्‍ये जवळपास १० टक्‍के ऊर्जा बचत, एअर कंडिशनर्समध्‍ये जवळपास २० टक्‍के ऊर्जा बचत आणि वॉशिंग मशिन्‍समध्‍ये जवळपास ७० टक्‍के ऊर्जा बचत होते. सॅमसंगच्‍या एआय श्रेणीमध्‍ये स्‍मार्ट डायग्‍नोसिस तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे, जे या अप्‍लायन्‍सेसना स्‍वत:हून समस्‍यांचे निदान करण्‍यास आणि वापरकर्त्‍यांना स्‍मार्टफोन अॅपच्‍या माध्‍यमातून सूचित करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामुळे त्‍वरित व कार्यक्षमपणे समस्‍येचे निराकरण होण्‍

याची खात्री मिळते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments