Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसक्षम यशदा उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*

सक्षम यशदा उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*

 

 

पुणे, दि. २७ : सक्षम यशदा उपक्रमांतर्गत तसेच आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून प्रकृति आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, औंध, यांच्या वतीने यशदा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात यशदामधील ६० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उपमहासंचालक सचिन कलंत्रे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि डॉ. हेमंत वसेकर उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. समीर भाले आणि डॉ. तेजस्विनी भाले-बोरसे यांनी नाडी परीक्षणासह विविध आरोग्य तपासण्या करून सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक औषधांचे वितरण केले. तसेच आहार, दैनंदिन जीवनशैली आणि पंचकर्म याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

डॉ. तेजस्विनी भाले-बोरसे यांनी ‘आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य का द्यावे?’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आपल्या २२ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी जीवनशैलीशी संबंधित आजारांची कारणे, त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल तसेच प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचे उपाय याबाबत माहिती दिली.

 

आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी निबंधक श्री. राजीव नंदकर आणि डॉ. राजेंद्र जोशी यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments