मुंबई, 05 July, 2024: ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंग या ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड (जीसीएल) च्या इंजीनिअरिंग विभागाने सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) ने स्थापित केलेल्या नवीन मानकाचे पालन करत नवीन सीपीसीबी IV+ कॉम्प्लीएण्ट जेनसेट्सची श्रेणी सादर केली आहे. उच्च-कार्यक्षम, विश्वसनीय व शाश्वत ऊर्जा सोल्यूशन्ससाठी ग्राहकांमधील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित करत ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंग आपला वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ सीपीसीबी IV+ प्रमाणित जेनसेट्स देत आहे, ज्यांची क्षमता ८०० किलोवॅट (kW) पेक्षा कमी विभागामध्ये ५ केव्हीए (kVA) पासून ५०० केव्हीए (kVA) पर्यंत आहे.
सीपीसीबी IV+ प्रमाणित जेनसेट्स जवळपास ९० टक्के कमी नायट्रोजन ऑक्साईड (NOx) व पार्टिक्युलेट मॅटर (पीएम)ची निर्मिती करतात, ज्यामुळे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी होते. म्हणून ही श्रेणी भारताला ८०० किलोवॅटपेक्षा कमी विभागामध्ये शाश्वतरित्या ऊर्जा देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नामधील महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रीव्ह्ज १०१० केव्हीएपासून २५०० केव्हीएपर्यंत क्षमता असलेले जेनसेट्स देखील देते.
निवासी वापरासाठी डिझाइन केलेल्या कॉम्पॅक्ट मॉडेल्सपासून व्यावसायिक व औद्योगिक उपयोजनांसाठी डिझाइन केलेल्या हेवी-ड्युटी युनिट्सपर्यंत व्यापक उत्पादन पोर्टफोलिओसह ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंग मॉल्स, मैन्युफैक्चरिंग यूनिट्स, रिअॅल्टी – निवासी व व्यावसायिक, पायाभूत सुविधा, रेल्वे, विमानतळ, हॉस्पिटल्स, बीएफएसआय, शैक्षणिक संस्था, पेट्रोल स्टेशन्स, डेटा सेंटर्स, क्रीडा सुविधा, सरकारी सुविधा, वेअरहाऊसिंग, मंदिर अशा क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीकरिता मदत करते.
आपल्या इंधनाप्रती धोरणानुसार निर्मिती करत ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंग बायोडिझेल व इथेनॉलचा वापर करणाऱ्या जेनसेट्ससह देखील सुसज्ज आहे. त्यांची डिप-स्कर्टेड क्रँककेस डिझाइन वजनाने हलक्या, पण शक्तिशाली बांधकामाची खात्री देते, देखभाल खर्च कमी करते आणि पोर्टेबिलिटी वाढवते. -५ अंश सेल्सिअस ते ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानांमध्ये सुरळीतपणे काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे जेनसेट्स त्यांच्या आवाज-विरहित अनुभवासाठी सायलेण्ट परफॉमर्स म्हणून ओळखले जातात.
ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरूप बासू म्हणाले, ”जेनसेट्सच्या नवीन सीपीसीबी IV+ प्रमाणित श्रेणीमधून पर्यावरणदृष्ट्या जबाबदार व कार्यक्षमदृष्ट्या शक्तिशाली असलेले अत्याधुनिक ऊर्जा सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंगची कटिबद्धता दिसून येते. नवीन सीपीसीबी नियम प्रमुख धोरणात्मक पाऊल असेल, जे उद्योगाला अधिक शाश्वत वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करतील. यासारखे नियम २०७० पर्यंत निव्वळ शून्य दर्जा संपादित करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.”
उद्योगामध्ये ५० वर्षांहून अधिक काळापासून कार्यसंचालन आणि विविध उपयोजनांमध्ये कार्यरत असलेल्या १ लाखाहून अधिक जेनसेट्ससह ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंग भारत आणि सार्क (SAARC) प्रांत, मिडल ईस्ट व आफ्रिका येथे वीज निर्मिती विभागातील विश्वासार्ह कंपनी आहे. ग्रीव्ह्ज भारतातील एकमेव कंपनी आहे, जी तळेगावमधील कंपनीच्या अत्याधुनिक मैन्युफैक्चरिंग प्लांटमध्ये जेनसेट्सची निर्मिती करते आणि भारतीय उत्पादन सर्वोत्तमतेचे पालन करते. उल्लेखनीय बाब म्हणजे, या जेनसेट्सनी १९८३ मध्ये अंटार्टिकामधील भारताच्या तिसऱ्या वैज्ञानिक मोहिमेला पाठिंबा दिला आणि भारतभरातील विविध उपयोजनांसाठी प्रमुख संस्थांना पाठिंबा देत आहे.
ग्राहक देशभरातील ग्रीव्ह्ज इंजीनिअरिंगच्या १२० हून अधिक सर्विस नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात, जे सिंगल विंडो सर्विस सपोर्ट, तसेच २४/७ सर्विस सपोर्ट आणि ‘ग्रीव्ह्ज १ अॅप’च्या माध्यमातून लाइव्ह रिमोर्ट मॉनिटरिंग या सेवा देतात. तसेच, ग्राहक ५ वर्षांची किंवा ५००० कार्यसंचालन तासांच्या प्रमाणित वॉरंटीमधून फायदा घेऊ शकतात*.
*अटी व निय
म लागू


