Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्या समर्थ पॅरा-स्पोर्टस प्रोग्राममध्ये 20 पॅरा-ॲथलीटसचा समावेश

ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्या समर्थ पॅरा-स्पोर्टस प्रोग्राममध्ये 20 पॅरा-ॲथलीटसचा समावेश

पुणे,8 जुलै 2024 : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) च्या समर्थ पॅरा-स्पोर्टस प्रोग्राममध्ये 20 पॅरा-ॲथलीटसचा तीन वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम गोस्पोर्टस फाऊंडेशन या एनजीओ भागीदाराच्या सहयोगातून करण्यात आला असून समर्थ बाय ह्युंडाई या व्यापक उपक्रमाचा भाग आहे.समर्थ पॅरा-स्पोर्टस प्रोग्राम द्वारे आर्थिक मदत,तज्ञ क्रीडा विज्ञान मार्गदर्शन,सहाय्यक उपकरणांचा वापर,सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंटबद्दल मार्गदर्शन,नामवंत प्रशिक्षक आणि तज्ञांकडून मार्गदर्शन अशा संरचित समर्थन दिले जाते.या कार्यक्रमात पॅरा-ॲथलेटिक्स, पॅरा- स्वीमिंग,पॅरा- बॅडमिंटन,पॅरा-आर्चरी,पॅरा-रोईंग,पॅरा-सायकलिंग,पॅरा- कॅनोईंग व व्हील चेअर टेनिस अशा 8 प्रमुख क्रीडा प्रकारांमध्ये प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments