Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedएन्.ई. एम्. एस्. मध्ये निघाली जलदिंडी* 

एन्.ई. एम्. एस्. मध्ये निघाली जलदिंडी* 

 

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन्.ई. एम्. एस्. पूर्व प्राथमिक विभाग (शनिवार पेठ) येथे आषाढी वारी निमित्त जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते . पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी पाणी वाचवा, पाणी जिरवा असा संदेश देणारे फलक छोट्या वारकऱ्यांनी हातात धरले होते. पाऊस पडा‌वा यासाठी झाडे लावा व झाडे जगवा याचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत मुलांनी पालखी मिरवत शाळेत आणली त्या नंतर पांडुरंगाची आरती करून प्रसाद देण्यात आला. सर्वांनी या वर्षी चांगला पाऊस होऊदे अशी प्रार्थना केली. शाळेतील शिक्षिका प्राची पासलकर यांनी पालखी परंपरेची माहिती सांगितली. शिक्षिका सुचेता वझे यांनी संत ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितली तर प्रतिभा गुरव यांनी सूत्रसंचालन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments