Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोणीकंद वाहतूक विभागाअंतर्गत जड वाहनांसाठी वाहतूक बंदीचे अंतिम आदेश जारी*

लोणीकंद वाहतूक विभागाअंतर्गत जड वाहनांसाठी वाहतूक बंदीचे अंतिम आदेश जारी*

 

 

पुणे, दि. १२: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने यापूर्वी लोणीकंद वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत.

 

पुणे शहरातील पुणे नगर रस्त्यावर वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बायपास, केसनंद रस्त्यावर वाघोली ते शिवाजी चौक केसनंद गाव, लोहगाव वाघोली रस्त्यावर लोहगाव चौक, वाघोली ते लोहगाव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी व पुणे नगर रस्त्यावर वाघेश्वर चौक, वाघोली ते लाणीकंद दरम्यान सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत तसेच लोहगाव रस्त्यावर लोहगाव पेट्रोलसाठा चौक ते विश्रांतवाडीदरम्यान सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती (डंपर, आर.एम.सी. मिक्सर, जी.सी.बी., रोड रोलर व इतर तत्सम वाहने) वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

यापूर्वी लोणीकंद वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून हे अंतिम आदेश जारी केल्याचे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments