पुणे, 12 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये तिसऱ्या फेरीत महिला गटात तारा शहा, तस्नीम मीर, श्रेया लेले यांनी तर, पुरुष गटात प्रणय शेट्टीगर, कौशल धर्ममेर, तुषार सुवीर यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
पी.ई. सोसायटीज पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटात तिसऱ्या फेरीत पुण्याच्या तारा शहा हिने सातव्या मानांकित दिल्लीच्या अनुपमा उपाध्यायचा 21-15 21-18 असा पराभव करून आजचा दिवस गाजवला. पंधराव्या मानांकित गुजरातच्या तस्नीम मीर हिने आंध्रप्रदेशच्या आठव्या मानांकित नवीन कंदेरीचा 22-20 18-21 21-14 असा संघर्षपूर्ण पराभव केला. गुजरातच्या बाराव्या मानांकित श्रेया लेले हिने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित आलिशा नाईकचे आव्हान 21-16 16-21 22-20 असे मोडीत काढले. अव्वल मानांकित आसामच्या ईशारानी बरुआने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत उत्तरप्रदेशच्या तरणजीत कौरवर 21-15 21-16 असा विजय मिळवला. उत्तरप्रदेशच्या चौथ्या मानांकित मानसी सिंगने दिल्लीच्या दीपशिखा सिंगचा 21-16 21-15 असा तर, पंजाबच्या दहाव्या मानांकित तन्वी शर्मा ने तेलंगणाच्या श्रेष्ठ रेड्डी के.ला 21-11 21-7 असे पराभूत केले.
पुरुष एकेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या बिगरमानांकित प्रणय शेट्टीगरने पाचव्या मानांकित आपलाच राज्य सहकारी आर्य भिवपत्कीचे आव्हान 21-17 15-21 21-15 असे तीन सेटमध्ये संपुष्टात आणले. चौदाव्या मानांकित महाराष्ट्राच्या कौशल धर्ममेरने मध्यप्रदेशच्या सातव्या मानांकित आलाप मिश्राला 21-19 21-15 असे नमविले. कर्नाटकच्या तुषार सुवीर याने दहाव्या मानांकित सौरभ वर्माचा 21-17 15-21 21-14 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पंधराव्या मानांकित हरियाणाच्या अभिषेक सैनीने तेलंगणाच्या सूर्या किरण रेड्डी डुंडीवर 21-9 21-13 असा विजय मिळवला.
निकाल: मुख्य ड्रॉ: महिला एकेरी: तिसरी फेरी:
ईशारानी बरुआ (आसाम)[1] वि.वि.तरणजीत कौर(उत्तरप्रदेश) 21-15 21-16;
तस्नीम मीर(गुजरात)[15] वि.वि.नवीन कंदेरी (आंध्रप्रदेश)[8] 22-20 18-21 21-14;
तन्वी शर्मा (पंजाब)[10] वि.वि.श्रेष्ठ रेड्डी के. (तेलंगणा) 21-11 21-7;
श्रेया लेले (गुजरात)[12]वि.वि.आलिशा नाईक(महा)[6] 21-16 16-21 22-20;
मानसी सिंग(उत्तरप्रदेश)[4]वि.वि.दीपशिखा सिंग(दिल्ली) 21-16 21-15;
तारा शहा(महा)वि.वि.अनुपमा उपाध्याय(दिल्ली)[7] 21-15 21-18;
तन्वी रेड्डी आंदलुरी (तेलंगण) वि.वि.ऐशानी तिवारी(गुजरात)11-21 21-16 21-18
पुरुष:
अभिषेक सैनी(हरियाणा)[15]वि.वि.सूर्या किरण रेड्डी डुंडी(तेलंगणा)21-9 21-13;
प्रणय शेट्टीगर (महा)वि.वि.आर्य भिवपत्की(महा)[5] 21-17 15-21 21-15;
तुषार सुवीर (कर्नाटक)वि.वि.सौरभ वर्मा[10] 21-17 15-21 21-14;
कौशल धर्ममेर(महा)[14]वि.वि.आलाप मिश्रा(मध्यप्रदेश)[7] 21-19 21-15;
मिश्र दुहेरी: पहिली फेरी:
चयनित जोशी(उत्तरप्रदेश)/काव्या गुप्ता (दिल्ली)[1] वि.वि.सिद्धार्थ एलांगो(तेलंगणा)/दिया अरुण(केरळ) 21-15 21-15;
समरवीर(छत्तीसगढ)/नवधा मंगलम (दिल्ली)वि.वि.आयुश दश(ओरीसा)/पूर्वा प्रत्याशा पांडा 21-15 21-11;
अक्षित महाजन(हरियाणा)/अनाघा पै(तेलंगणा)[7]वि.वि.लालरामसांगा सी.(मिझोराम)/मनाली
बोरा(आसाम) 22-20 22-20


