पुणे – ‘अथातो बिंब जिज्ञासा’ या मंदिरस्थापत्य व मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे यांनी दिली.
‘अथातो बिंब जिज्ञासा’ हे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय मूर्तीची रंगीत फोटोंसह माहिती असलेलं पुस्तक आहे. मूळ पुस्तक डॉ. देगलूरकर यांनी इंग्रजीत लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद आशुतोष बापट यांनी केला आहे. या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी २० जुलैला कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर प्रशाला एम.ई.एस. ऑडिटोरियम येथे सकाळी १० वाजता होणार आहे.


