पुण्यातील या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीच्या नवीन जाहिरातीत शरद केळकर दिसणार आहेत. या मोहिमेत घर आणि कामाच्या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश, हवा, हिरवळ आणि मोकळ्या जागेचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
पुणे, 12 नोव्हेंबर 2026: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी एसबी रिअल्टी ने अभिनेता शरद केळकर यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच ‘स्पेसेस दॅट ब्रीद’ ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. नैसर्गिक प्रकाश, हवा खेळती राहणे, हरित परिसर आणि मोकळ्या जागा या संकल्पनांवर ही मोहीम आधारित आहे. घर किंवा कामाच्या ठिकाणाची रचना माणसांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते, तसेच त्यांना आराम करण्यासाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्यासाठी कशी मदत करते, हे दाखवण्यात आले आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सहा वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एसबी रिअल्टीने पुण्यात आतापर्यंत 10 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. सध्या 20 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहेत, तर 50 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे प्रकल्प आगामी काळात सुरू होणार आहेत.
विविध भाषांमधील राष्ट्रीय चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनमध्ये विविध मालिकांमध्ये काम केल्यामुळे शरद केळकर यांनी प्रादेशिक तसेच देशभरातील वेगवेगळ्या वयोगटांतील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. पडद्यावरील प्रभावी अभिनयासोबतच त्यांचा साधेपणा आणि आपलेपणा प्रेक्षकांना भावतो. विश्वास, आकांक्षा आणि नात्यांमधील जिव्हाळा या एसबी रिअल्टीच्या मूल्यांशी त्यांचे व्यक्तिमत्त्व जुळणारे आहे. चित्रपटांचे शूटिंग, प्रवास आणि विविध कामांमुळे शरद केळकर यांचे आयुष्य सतत धावपळीचे असते. त्यामुळे दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ काढून घरी शांतपणे राहता येईल, अशा घराचे महत्त्व त्यांच्या जीवनशैलीतूनही दिसून येते हाच विचार या मोहिमेत मांडण्यात आला आहे.
या जाहिरात चित्रपटात शरद केळकर बाहेरच्या धावपळीच्या जगापासून दूर जाऊन घरातील आरामदायी वातावरणाचा आनंद घेताना दिसतात. झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचणे, घराबाहेरील मोकळ्या जागेत वेळ घालवणे आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवणे अशा साध्या गोष्टींमधून घराला खऱ्या अर्थाने घरपण कसे मिळते, हे दाखवण्यात आले आहे.
या छोट्या-छोट्या प्रसंगांतून मोहिमेत दोन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. एक म्हणजे घरातील नैसर्गिक प्रकाश, शुद्ध हवा आणि मोकळ्या जागा, तर दुसरी म्हणजे घरात आल्यावर मिळणारी मनःशांती आणि मोकळेपणाची भावना. एसबी रिअल्टीच्या ‘ऑक्सिजनेटेड होम्स’ या घरांच्या रचना संकल्पनेतून ही कल्पना मांडण्यात आली आहे. या संकल्पनेत घरात हवा खेळती राहावी, नैसर्गिक प्रकाश मिळावा आणि हिरवळीने वेढलेल्या मोकळ्या जागा असाव्यात, याला प्राधान्य दिले जाते. केवळ घरांसाठीच नव्हे, तर कंपनीच्या कार्यालये आणि व्यावसायिक जागांच्या रचनेतही हाच विचार वापरला जातो. या जागा उपयुक्त, मोकळ्या आणि त्यांचा रोज वापर करणाऱ्या लोकांसाठी आरामदायी असाव्यात, यावर भर दिला जातो.
या भागीदारीबद्दल बोलताना एसबी रिअल्टीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज अग्रवाल म्हणाले, “चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या जागेचे खरे महत्त्व तिथे राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनात किती चांगला बदल घडतो, यावर ठरते. दिवसभराच्या धावपळीनंतर लोक आपल्याघरी परततात, तेव्हा त्यांना कसे वाटते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. नैसर्गिक प्रकाश, शुद्ध हवा, हिरवळ आणि योग्य नियोजनातून तयार केलेल्या मोकळ्या जागा यामुळे घर अधिक आरामदायी आणि आनंददायी बनते.”
“हीच विचारसरणी आमच्या ‘स्पेसेस दॅट ब्रीद’ या मोहिमेमागे आहे. त्यामुळे शरद केळकर यांची या अभियानासाठी निवड करणे स्वाभाविक होते. कारण व्यस्त व्यावसायिक जीवनातही कुटुंबासाठी वेळ काढणे आणि घरात आराम व समाधान मिळवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना समजते. या मोहिमेद्वारे घराला खास बनवणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे आम्हाला लोकांचे लक्ष वेधायचे आहे. तसेच, विचारपूर्वक डिझाइन करून तयार केलेली जागा दैनंदिन जीवन अधिक चांगले आणि आनंददायी कसे बनवू शकते, हेही दाखवायचे आहे.”
आपले विचार व्यक्त करताना शरद केळकर म्हणाले, “शूटिंग आणि प्रवास यामुळे मी नेहमी व्यस्त असतो. त्यामुळे घरात मिळणारा वेळ माझ्यासाठी खूप मौल्यवान असतो. घरी आल्यावर मी कामाचा ताण बाजूला ठेवतो, कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेतो. ‘स्पेसेस दॅट ब्रीद’ ही मोहीमहीच भावना व्यक्त करते. घर केवळ दिसायला सुंदर असणे महत्त्वाचे नाही, तर तिथे गेल्यावर आपल्याला कसे वाटते, हेही अधिक महत्त्वाचे आहे. हा विचारइतक्या सोप्या पद्धतीने मांडणाऱ्या मोहिमेचा भाग होताना मला आनंद होत आहे.”
ही मोहीम वर्षअखेरीपर्यंत पुणे शहरात रेडिओ, जाहिरात फलक, चित्रपटगृहे, विमानतळ आणि डिजिटल माध्यमांद्वारे राबवले जाणार आहे. या मोहिमेतील ब्रँड फिल्मच्या माध्यमातून डिजिटल प्रचारावर विशेष भर दिला जाणार आहे. जानेवारी 2027 मध्ये ही मोहीम क्रेडाई (CREDAI) पर्यंत विस्तारली जाणार असून, त्यावेळी ब्रँड आणि त्यांच्या प्रकल्पांनुसार मोहिमेत आवश्यक बदल केले जातील.
मोहिमेची फिल्म पाहण्यासाठी: https://youtu.be/Ze_L1LIg0wg?si=sUNY
BpoTnRKHfLrG


