Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसातारा येथील कारगिल विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन*

सातारा येथील कारगिल विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार २६ जुलै २०२४ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमाकरीता पुणे जिल्ह्यातील सर्व कारगिल युद्ध शहीद परिवार, शौर्य पुरस्कार विजेते व जखमी सैनिकांना या कार्यक्रमाकरीता घेवून जाण्या-येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर इच्छुक माजी सैनिक, सैनिक पत्नी, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना या कार्यक्रमास जाण्यासाठी महासैनिक लॉन्स, सैनिक कल्याण विभाग, घोरपडी, पुणे येथून दोन बस २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ६.३० वा. जाणार आहेत. तरी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे आपली नावे नोंदवावीत. प्रथम नाव नोंदणी करण्याऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दे. (नि.) यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments