Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड ही क्रिसिल अहवालानुसार, आर्थिक 2023 प्रमाणे परिचालन उत्पन्नाच्या बाबतीत पूर्व भारतात मुख्यालय असलेली सर्वात मोठी पूर्ण-सेवा आणि एकात्मिक निदान साखळी असलेली कंपनी आहे. कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आणण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला आहे.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुदानुसार, कोलकाता मुख्यालय असलेल्या कंपनीच्या या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये विक्रीसाठी ऑफर करणाऱ्या भागधारकांद्वारे 19,189,330 इक्विटी समभागांपर्यंतचा समावेश आहे..

 

 

 

विक्रीसाठी असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार विक्री समभागधारकांमध्ये OrbiMed Asia II मॉरिशस लिमिटेडच्या 10,660,737 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. प्रवर्तक विक्री भागधारक – डॉ. सोमनाथ चटर्जी, रितू मित्तल आणि सतीश कुमार वर्मा या प्रवर्तकांच्या प्रत्येकी 2,132,148 इक्विटी शेअर्स इथपर्यंत आणि वैयक्तिक विक्री भागधारकमध्ये मुन्ना लाल केजरीवाल आणि संतोष कुमार केजरीवाल अनुक्रमे 799,556 इक्विटी शेअर्स व 1,332,593 इक्विटी शेअर्सपर्यंत ऑफर करण्यात येत आहे.

 

 

 

विक्री करणाऱ्या भागधारकांद्वारे 19,189,330 इक्विटी समभागांच्या विक्रीची ऑफर पार पाडणे आणि स्टॉक एक्स्चेंजवर इक्विटी शेअर्स सूचिबद्ध करण्याचे फायदे मिळविणे ही या ऑफरची उद्दिष्टे आहेत.

 

 

 

डॉ. सोमनाथ चटर्जी यांनी दिवंगत किशन कुमार केजरीवाल यांच्यासमवेत 1992 मध्ये ‘सुरक्षा’ ब्रँड अंतर्गत कोलकाता येथे एक संपूर्ण व्यापक निदान केंद्र उभे केले. सध्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. सोमनाथ चटर्जी आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रितू मित्तल हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. कंपनी पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी चाचणीसाठी एक-स्टॉप एकात्मिक उपाय व वैद्यकीय सल्ला सेवा आपल्या ग्राहकांना त्याच्या विस्तृत ऑपरेशनल नेटवर्कद्वारे देते. ज्यामध्ये फ्लॅगशिप केंद्रीय संदर्भ प्रयोगशाळा, 8 उपग्रह प्रयोगशाळा (निदान केंद्रांसह सह-स्थित) आहेत. 194 ग्राहक टचपॉइंट्स ज्यात 31 मार्च 2024 पर्यंत पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये 48 निदान केंद्रे आणि 146 नमुना संकलन केंद्रे (प्रामुख्याने फ्रँचायझी) समाविष्ट आहेत.

 

 

 

सुरक्षा कंपनी विविध वैशिष्ट्ये आणि विषयांचा समावेश असलेल्या 2,300+ चाचण्यांची सर्वसमावेशक सेवा देते.

 

 

 

आर्थिक वर्ष 2024 दरम्यान, अंदाजे 1.14 दशलक्ष रुग्णांना सेवा देणाऱ्या अंदाजे 5.98 दशलक्ष चाचण्या केल्या.

 

 

 

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments