पुणे,25 जुलै 2024 : मेटा एआय आता हिंदीसह सात नवीन भाषांमध्ये, तसेच जगभरातील अधिक देशांमध्ये आणि पहिल्यांदाच लॅटिन अमेरिकेमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. दृष्टीकोन व कल्पनेला प्रत्यक्षात इमेजेसमध्ये उतरविण्यासाठी नवीन मेटा एआय क्रिएटिव्ह टूल्स सादर करण्यात आले आहेत. कठीण गणित व कोडिंग प्रश्न आणि अधिक गुंतागुंतींच्या प्रोजेक्ट्ससाठी मेटा एआयमधील सर्वात मोठ्या व सर्वात क्षमतापूर्ण ओपन-सोर्स मॉडेलचा वापर करण्याचा पर्याय आहे.
ॲप्स व डिवाईसेसमधील सहाय्यक मेटा एआय अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत उत्तरं, संकल्पना व प्रेरणेसह मदत करण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत. मेटा एआय आता 22 देशांसह आजपासून अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू आणि कॅमेरूनमध्ये उपलब्ध आहे. हिंदी, हिंदी-रोमनाइज्ड स्क्रिप्ट, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या नवीन भाषांमध्ये व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, मेसेंजर व फेसबुकवरील मेटा एआयसह वारकर्त्यांना संवाद साधता येणार आहे.


