Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्ट्राव्हायोलेट’तर्फे पुण्यात यूव्ही स्पेस स्टेशन या अत्याधुनिक रीटेल एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन

अल्ट्राव्हायोलेट’तर्फे पुण्यात यूव्ही स्पेस स्टेशन या अत्याधुनिक रीटेल एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन

अल्ट्राव्हायोलेटच्या ५० ग्लोबल फ्युचरिस्टिक एक्स्पिरियन्स सेंटर्स स्थापन करण्याच्या ध्येय दृष्टिकोनात पुण्यातील यूव्ही स्पेस स्टेशनचा प्रवेश

 

· पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये मध्यवर्ती वसलेले अल्ट्राव्हायोलेट स्पेस स्टेशन म्हणजे विक्री, सेवा व सुटे भाग यांसह व्यापक ब्रँड अनुभव पुरवणारी 3S सुविधा

 

· पुण्यातील स्पेस स्टेशन प्रगत डिजीटल डायग्नॉस्टिक क्षमतेने सज्ज आणि अल्ट्राव्हायोलेटच्या मुख्यालयातूनही ऑन-कॉल तांत्रिक सहकार्य मिळवून देणार

 

बंगळुरु, ३० जुलै २०२४ – इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्म्स व बॅटरी तंत्रज्ञानातील आघाडीची अभिनव कंपनी असलेल्या अल्ट्राव्हायोलेटने (यूव्ही) पुण्यात शिवाजीनगरमध्ये अल्ट्राव्हायोलेट स्पेस स्टेशन हे आपले रीटेल एक्स्पिरियन्स सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर २१०० चौरस फुटांच्या प्रशस्त जागेत कार्यान्वित झाले असून अल्ट्राव्हायोलेटच्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना मालकीचा अद्वितीय अनुभव मिळवून देण्याच्या हेतूने त्याची काटेकोर रचना करण्यात आली आहे. या केंद्रात कंपनीची F77 MACH 2 स्पोर्ट्स बाइक टेस्ट राइड व खरेदीसाठी उपलब्ध असेल.

 

पुणे ही दुचाकी वाहनांसाठीची प्रमुख बाजारपेठ असून अल्ट्राव्हायोलेटचाही मोठा ग्राहकवर्ग येथे आहे. कंपनीचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर ग्राहकांशी संपर्क व व्यवसायाची व्याप्ती वाढवेलच, पण स्वयं-सक्रियतेने उच्च दर्जाची सेवा पुरवण्याची कंपनीची कटिबद्धताही अधिक मजबूत करेल. ग्राहकांना सखोल अनुभूती व व्यापक ब्रँड अनुभव देण्याच्या हेतूने या स्टोअरची रचना करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात अल्ट्राव्हायोलेटचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रह्मण्यम म्हणाले, “मोटरसायकलिंगची समृद्ध संस्कृती असलेल्या आणि दीर्घकाळापासून वाहन उद्योगातील उत्कृष्टतेचे केंद्र असणाऱ्या पुणे शहरात आता अल्ट्राव्हायोलेट कंपनीने पदार्पण केल्याचे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. पुण्याचे धोरणात्मक स्थान व चैतन्यशील बाजारपेठ यामुळे हे ठिकाण आमच्या विस्तारासाठी आदर्श निवड आहे. परफॉर्मन्स मोटारसायकलींची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच एक व्यापक ब्रँड अनुभव मिळवून देण्यासाठी यूव्ही स्पेस स्टेशनची रचना करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांनी युक्त तसेच वाढत्या ग्राहकवर्गासमवेत सखोल नाते जोपासणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट एक्स्पिरियन्स सेंटर्सचे भक्कम जाळे तयार करण्यासाठी आम्ही शहरांची निवड धोरणात्मक पद्धतीने करत असतो.”

 

नव्या एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये विक्री व देखभालीच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या सुविधांची व्यापक श्रेणी असून त्यात शोरुम व डिस्प्ले एरिया, सर्व्हिस सेंटर व वर्कशॉप, चार्जिंग सुविधा व कस्टमर लाउंजचा समावेश आहे. यूव्ही स्पेस स्टेशनला भेट देणारे ग्राहक येथून भविष्यवेधी व नव्या युगातील ग्राहक अनुभवाची अपेक्षा करु शकतील अशा पद्धतीने येथे संवादात्मक तंत्रज्ञान क्षेत्र, अखंड वाहन समन्वय, तंत्रज्ञानाधारित उत्पादने, सुट्या भागांसाठी क्षेत्र, वाहन चालवण्याचा अनुभव, वाहन वितरणाचे क्षेत्र व व्यापक सेवा पाठबळ उपलब्ध केलेले आहे.

 

पुण्यातील नव्या रीटेल सेंटरच्या महत्त्वावर भर देताना अल्ट्राव्हायोलेटचे सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नीरज राजमोहन म्हणाले, “येथे अत्याधुनिक सेवा केंद्रापासून ते चार्जिंग सुविधेपर्यंतच्या प्रत्येक पैलूची रचना दर्जा व सोयींच्या सर्वोच्च गुणवत्ता निकषांची पूर्तता करण्याच्या हेतूने केलेली आहे. सर्वांगीण व उच्च दर्जाचा ग्राहक अनुभव देण्यावर आमचा विश्वास असून देशभरात परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकलींच्या स्वीकाराचा वेग आम्ही वाढवू शकतो. पुण्यातील आमचे विक्री व देखभाल संघ बंगळुरुच्या अल्ट्राव्हायोलेट ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षीत व प्रमाणित आहेत.”

 

पुणे स्पेस स्टेशनचे उद्घाटन हा अल्ट्राव्हायोलेटच्या विस्तार धोरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीने जगभरात ५० ग्लोबल फ्युचरिस्टिक एक्स्पिरियन्स सेंटर्स स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यात पुण्यातील यूव्ही स्पेस स्टेशन जोडले गेले आहे. हे नवे केंद्र पुणे व लगतच्या भागांतील सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना सेवा पुरवेल.

 

हे एक्स्पिरियन्स सेंटर शोरुम नं. S3, एपिसेंटर 64-C1, जुना मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी कार्यान्वित झाले आहे.

 

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हविषयी

 

अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) ही भविष्यसज्ज इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्म व बॅटरी तंत्रज्ञानातील अभिनव कंपनी नारायण सुब्रह्मण्यम व नीरज राजमोहन या संस्थापकांच्या संकल्पनेतून वर्ष २०१६ मध्ये उदयास आली. कंपनीला लिनगॉट्टोसारख्या (फेरारी, स्टेलान्टिस, सीएनएच इंडस्ट्रियल, आयव्हेको ग्रुप, द इकॉनॉमिस्ट ग्रुप, व्हाया व ज्युवेंटस असे नामवंत ब्रँड व जागतिक आघाडीच्या कंपन्यांत प्रमुख हिस्सा असलेल्या एक्झॉर एन. व्ही कंपनीची उपकंपनी), क्वालकॉम व्हेंचर्स, झोहो कॉर्पोरेशन, टीव्हीएस मोटर व स्पेशिएल इन्व्हेस्ट आदी जागतिक गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे.

 

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – https://www.ultraviolette.com/

 

 

 

Social Media

 

● Instagram: @ultraviolette_automotive

 

● YouTube: @UltravioletteEV

 

● Twitter: @UltravioletteEV

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments