Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महाकाली व त्रिशुळ पुष्पप्रतिकृतीमध्ये मंडईतील म्हसोबाराया विराजमान* *अखिल म्हसोबा उत्सव...

श्री महाकाली व त्रिशुळ पुष्पप्रतिकृतीमध्ये मंडईतील म्हसोबाराया विराजमान* *अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ

 

 

पुणे : मंडईतील म्हसोबा मंदिरात विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या श्री महाकाली व त्रिशुळाच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले आहेत. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आणि त्यांच्या पत्नी पूजा जाधव यांच्या हस्ते श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तर, दुपारी भितांडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, स्मिता भिंताडे, पृथ्वी भिंताडे, ईशा भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाली.

 

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली. दीपक जोशी गुरुजी यांसह ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.

 

मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या श्री महाकाली व त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी नंदी, शिवपिंड आणि त्रिशुळाच्या भव्य पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत. याकरिता शेवंती, झेंडू, गुलाब यांसह अनेक फुले वापरण्यात आली आहेत. सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली कारागिरांनी ही आरास साकारली आहे. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे या उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

 

धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये कर्णबधिर मुलांना आर्थिक निधी प्रदान, गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम तसेच पोतराज समाजातील मुलांना मदत देखील देण्यात येणार आहे. दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments