Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडियातर्फे पी बालाजी यांची समूह प्रमुख पदी - गर्व्हनन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स...

एयर इंडियातर्फे पी बालाजी यांची समूह प्रमुख पदी – गर्व्हनन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स (जीआरसी) आणि कॉर्पोरेट अफेयर्स नियुक्ती

गुरुग्राम, ३ जानेवारी २०२४ – एयर इंडियाने आज नव्याने तयार करण्यात आलेल्या समूह प्रमुख – गर्व्हनन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स (जीआरसी) आणि कॉर्पोरेट अफेयर्स पदावर पी. बालाजी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
बालाजी एयर इंडियातील आपला पदभार ११ जानेवारी २०२४ पासून स्वीकारणार असून ते एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांना रिपोर्ट करतील. त्याशिवाय ते एयर इंडियामधील सरकारी कामकाज, कायदेशीर, नैतिक, शाश्वतता, कम्युनिकेशन्स इत्यादी कामकाजही हाताळणार आहेत.
बालाजी यांनी टाटा अडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस कंपनीपासून आपल्या करियरची सुरुवात केली. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक धोरणे, अनुशासन, विक्री, उत्पादन व्यवस्थापन, विपणन, धोरणे, एम अँड ए आणि इतर कामकाज अशा विविध विभागांचा ३० वर्षांचा अनुभव त्यांना लाभला आहे. व्होडाफोन इंडिया लिमिटेडमध्ये ते नियामक आणि सार्वजनिक धोरण कामकाज विभागाचे नेत्त्व करत होते. तिथे १० वर्ष काम केल्यानंतर ते एयर इंडियामध्ये रूजू झाले.
बालाजी यांच्या नियुक्ती जाहीर करताना एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘बालाजी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. नियामक आणि धोरण क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव आणि ज्ञान त्यांना लाभले असून त्याचा एयर इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या स्थित्यंतराच्या प्रवासात मोठा फायदा होईल. एयर इंडियामध्ये आम्ही उच्च नेतृत्वगट तयार करत असून कंपनीला जागतिक विमानसेवा क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक स्त्रोतांमध्ये गुंतवणूक करत राहू.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments