Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव, नवरात्राच्या काळात उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमाची मंडळांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी डॉ....

गणेशोत्सव, नवरात्राच्या काळात उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमाची मंडळांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*

 

 

पुणे, दि.९: आगामी गणेशोत्सव, नवरात्राच्या काळात मंडळांनी जिल्ह्यात केंद्रपुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

 

सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ हजार ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ हजार २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्र शासनाने विशेष लक्ष दिले असून उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ३८ हजार ८०८ असाक्षराची उल्लास ॲप नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित साक्षरता सप्ताह, गणेशोत्सव श्री गणेश चतुर्थी (७ सप्टेंबर) ते अनंत चतुर्थी (१७ सप्टेंबर) तसेच नवरात्रोत्सव (३ ते १२ ऑक्टोबर) या कालावधीत उपक्रमाचे आयोजन करावे. गणेश मंडळानी उल्लास कार्यक्रमावर आधारित बॅनर लावावेत, वकृत्व, चित्रकला, रांगाळी, वादविवाद, गीतगायन, सामान्य ज्ञान व कथाकथन स्पर्धा आयोजित कराव्यात.

 

आपल्या परिसरात ५० ते १०० असाक्षरांना शाळांच्या सहाय्याने साक्षर करण्याकरीता गणेश मंडळ सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे. सन २०२३-२४ या वर्षात उत्तीर्ण नव साक्षरांचा सन्मान करणे, त्यांच्या मुलाखती व मनोगतांचे आयोजन करणे, आदी उपक्रम आयोजित करावेत. जिल्हा व तालुकास्तरावर उपक्रम आयोजित करणाऱ्या मंडळाना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments