Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीकांत शेटे यांना लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर पुणे परिवार तर्फे गणेशोत्सव...

श्रीकांत शेटे यांना लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर पुणे परिवार तर्फे गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार

पुणे : पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांना जाहीर झाला आहे. शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता एसपी महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गणेशोत्सव कार्यकर्त्यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे परिवारचे विनायक घाटे, ॲड. प्रताप परदेशी , शिरीष मोहिते यांनी दिली.

 

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.

 

परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल लोकमान्य गणेश सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर अमित पळसकर, सचिन पवार, रविंद्र पठारे, हर्षद नवले, अंकुश जाधव यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रुद्रगर्जना वाद्यपथक आणि युसुफ बागवान यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments