Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण य़ोजना बैठक..

पिंपरी -चिंचवड महापालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण य़ोजना बैठक..

पिंपरी, दि. २२ ऑगस्ट २०२४ – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ इच्छुकांना देण्यासाठी महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करित असून शहरात रोजगार मेळाव्यांचे देखील आयोजन केले जाणार आहे. यामध्ये शहरातील सर्व औद्योगिक आस्थापनांनी सहभाग घेऊन युवकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील प्रमुख औद्योगिक आस्थापनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयुक्त शेखर सिंह यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव तसेच शहरातील प्रमुख औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

 

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड नगरी औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. येथे मोठ्या प्रमाणावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फायदेशीर ठरणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार या योजनेतील पात्र व्यक्तींना त्या त्या निकषांनुसार आर्थिक स्वरूपात विद्यावेतन शासनाकडून दिले जाणार आहे. औद्योगिक आस्थापनांनी या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, तसेच रोजगारासाठी ज्या इच्छुकांनी आपले अर्ज संकेतस्थळावर नोंदविली आहेत त्यांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संधी उपलब्ध करून देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत.

 

पात्र युवकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील औद्योगिक आस्थापनांसमवेत वेबिनारद्वारे बैठक घेण्यात येऊन त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकीदरम्यान समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची कार्यप्रणाली, निकष तसेच देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाबाबत सविस्तर माहिती दिली.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विषद करत उपस्थितांना या योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments