Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

पिंपरी, दि.२३ ऑगस्ट २०२४ : १७ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत ४० किलो खालील वजनी गटात आर्यन जाधव, ४५ किलो खालील वजनी गटात आशिष गौतम मिस्त्री, ५० किलो खालील वजनी गटात हर्षित तिवारी, ५५ किलो खालील वजनी गटात पुष्कर चौलवार, ६० किलो खालील वजनी गटात साहिल पाथरट, ६६ किलो खालील वजनी गटात ज्योतिरादित्य मुळे, ७३ किलो खालील वजनी गटात सुरज कविटकर, ८१ किलो खालील वजनी गटात सौमित सिंग, ९० किलो खालील वजनी गटात नील गुरव या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.

 

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध वजनी गटात जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील शालेय ज्युदो स्पर्धेचे आयोजन कावेरीनगर क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.

 

या स्पर्धेत ४० किलो खालील वजनी गटात जाधववाडी येथील अभिनव विद्या शाळेच्या आर्यन जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला असून एस.डी. गणगे प्रशालेचा श्रीमंत पवार याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मातृविद्यालयाच्या कार्तिक यादव आणि एस.डी. गणगे प्रशालेच्या ओमकार मोरे या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

४५ किलो खालील वजनी गटात काळेवाडी येथील एम.एम. विद्यामंदिरच्या आशिष मिस्त्री याने प्रथम क्रमांक पटकावला. तर पीसीएमसी क्रीडा प्रबोधिनीचा दिवाकर पांडे हा द्वितीय ठरला. तसेच न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या आबिंद पटेल आणि एस.डी. गणगे प्रशालेच्या आयुष कापसे या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

५० किलो खालील वजनी गटात थेरगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या हर्षित तिवारीने विजेतेपद पटकावले असून न्यू पुणे पब्लिक स्कूलचा शंभू बहिरवाडे याने दुसरा क्रमांक पटकावला. तसेच थेरगाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सार्थक झोरे आणि एस.डी. गणगे प्रशालेतील गंगाधर पाटील या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

५५ किलो खालील वजनी गटात दि न्यू मिलेनियम स्कूलच्या पुष्कर चौलवार याने पहिला क्रमांक मिळवला. तर राजमाता जिजाऊ कॉलेजचा सार्थक किते हा दुसऱ्या स्थानी कायम राहिला. महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या सदन भन्सारी आणि भारतीय जैन शाळेच्या विकास पवार या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

६० किलो खालील वजनी गटात राजमाता जिजाऊ कॉलेजचा साहिल पाथरट अव्वल ठरला असून एम.एम विद्यामंदिरचा पृथ्वीराज थोरात याने द्वितीय तर न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या कौस्तुभ उणे आणि एस.बी. पाटील शाळेच्या आयुष सायकर या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

६६ किलो खालील वजनी गटात राजमाता जिजाऊ कॉलेजच्या ज्योतिरादित्य मुळे, ज्ञानज्योती शाळेच्या सुनील गुठ्ठे अनुक्रमे प्रथम, द्वितीय ठरले असून एमएम विद्यामंदिरच्या श्रेयस सुद्रिक आणि राजमाता जिजाऊ कॉलेजचा आर्य गव्हाणे या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

७३ किलो वजनी गटात राजमाता जिजाऊ कॉलेजचा सुरज कविटकरने प्रथम, सी.एम.एस शाळेच्या अब्दुल हाफिज खालिद इनामदार याने द्वितीय तर महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या यश वाघमोडे आणि एम.एम विद्यामंदिरच्या नवनाथ गिरी या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

८१ किलो वजनी गटात न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या सौमित सिंगने प्रथम क्रमांक पटकावला. तर महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या पार्थ तांबुरे याने द्वितीय आणि एस.डी. गणगे प्रशालेचा ऋषिकेश कावळे याने तृतीय क्रमांक पटकावला.

 

९० किलो खालील वजनी गटात एस.बी. पाटील स्कूलच्या नील गुरव आणि प्रतिक घुगे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या शौर्य सोनवणे आणि हर्शल भराटे या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. त्याचबरोबर ९० किलो वरील वजनी गटात सी.एम.एस शाळेचा जय भोंडवे याने प्रथम क्रमांक पटकावला.

 

ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्या निर्देशानुसार क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments