टोटो इंडियाची ४० नवीन चॅनेल सहयोगींची भर करत २०२४ मध्ये आपले वितरण नेटवर्क विस्तारीत करण्याची योजना
गुजरात, भारत – २१ ऑगस्ट २०२४ – दशकभरातील सर्वोत्तमतेला साजरे करत टोटो इंडिया (TOTO India) हलोल, (गुजरात) येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन प्लांटचा १०व् वर्धापण दिन साजरा करत आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून हा प्लांट भारतातील बाजारपेठेप्रती टोटोच्या दृष्टिकोनासाठी आधारस्तंभ राहिला आहे, ज्यामधून कटिबद्धता, नाविन्यता, दर्जा व शाश्वतता दिसून येते.
टोटो इंडिया हलोल प्लांट उत्पादने निर्माण करते, जे जपानी दर्जा मानकांचे पालन करतात आणि कंपनीच्या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देतात, जेथे २०१४ पासून आऊटपुटमध्ये ४०० टक्क्यांची वाढ झाली आहे, तसेच उच्च दर्जाचे उत्पादन मानक राखले जाते. जवळपास १,२०० कर्मचारी, त्यामध्ये ८० टक्के कर्मचारी स्थानिक समुदायामधून असण्यासह या प्लांटमधून प्रादेशिक विकास आणि रोजगाराप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
”भारत टोटोसाठी धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि आम्हाला या बाजारपेठेच्या व्यापक विकास क्षमतेबाबत आनंद होत आहे,” असे टोटो इंडिया इंडस्ट्रीज प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शिओझावा काझुयुकी म्हणाले. ”वाढते शहरीकरण, वाढते क्रय उत्पन्न आणि स्वच्छता व स्वास्थ्याबाबत वाढती जागरूकता प्रीमियम बाथरूम सोल्यूशन्ससाठी मागणीला गती देत आहेत. आमचे डिलर नेटवर्क विस्तारीत करत आणि ग्राहकांच्या विविध पसंतींची पूर्तता करण्यासाठी उत्पादनांची व्यापक श्रेणी सादर करत आमचा द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील आमची उपस्थिती प्रबळ करण्याचा मनसुबा आहे.” इव्हेण्टमध्ये उत्पादन नाविन्यता आणि विकासगती दाखवण्यात आली, ज्यामधून भारतातील बाजारपेठेप्रती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसोबत त्यांच्या कामाप्रती कंपनीची समर्पितता दिसून येते.”
टोटो इंडियाची आपली प्रादेशिक उपस्थिती वाढवण्याची आणि आपल्या ऑथोराइज्ड चॅनेल पार्टनर (एसीपी) व ऑथोराइज्ड चॅनेल डिलर (एसीडी) प्रोग्राम्सच्या माध्यमातून डिलरशिप नेटवर्क प्रबळ करण्याची योजना आहे. या धोरणाचा ब्रँडची भारतातील उपस्थिती वाढवण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी देशभरात त्यांच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या सर्वोत्तम उपलब्धतेची खात्री घेतली जात आहे. विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणींच्या शहरांमधील बाजारपेठेत उपलब्धता वाढवत टोटो त्यांचे नाविन्यपूर्ण व टिकाऊ सॅनिटरी वेअर सोल्यूशन्स अधिकाधिक ग्राहकांसाठी सादर करण्याचा प्रयत्न करते.
उत्पादनांची नवीन श्रेणी लाँच करण्याच्या योजनांसह टोटोचा भारतातील ग्राहकांच्या डायनॅमिक गरजांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे बाजारपेठेतील त्यांची उपस्थिती अधिक दृढ होत आहे. तसेच, ब्रँड टॉयलेट्स, बेसिन्स, फॉकेट्स, शॉवर्सचे नवीन कलेक्शन लाँच करण्यास सज्ज आहे, जे भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. उत्पादन क्षमता, नाविन्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आणि विस्तारीत डिलर नेटवर्क एकत्रित करत टोटोचा भारतातील प्रीमियम बाथरूम सोल्यूशन्ससाठी पसंतीचा ब्रँड बनण्याचा मनसुबा आहे.
टोटो इंडिया बाबत
टोटो इंडिया इंडस्ट्रीज प्रा. लि. टोटो ग्लोबल ग्रुपच्या ग्रुप कंपन्यांपैकी एक आहे. टोटो इंडियाचे कॉर्पोरेट कार्यालय मुंबईमध्ये आहे आणि त्यांच्या हलोल, गुजरात प्लांटने भारतात १० वर्ष पूर्ण केली आहेत.
टोटोचे ट्रेड नेटवर्क भारतभरात पसरलेले आहे आणि टॉयलेट्स, फॉकेट्स, बाथटब्स व शॉवर्स असे जागतिक दर्जाचे सॅनिटरी वेअर सोल्यूशन्स देण्याप्रती कटिबद्ध आहे, या सर्वांमधून आकर्षक डिझाइन व उच्च दर्जाची कार्यक्षमता दिसून येते.
टोटो सॅनिटरी वेअर उद्योगामधील जागतिक स्तरावर प्रख्यात अग्रणी कंपनी आहे, जी नाविन्यपूर्ण व उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी ओळखली जाते. टोटोने प्रगत तंत्रज्ञानांसह बाथरूम्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे, जसे एकीकृत टॉयलेट व बिडेट सिस्टम वॉशलेट, जी अद्वितीय स्वच्छता व आरामदायीपणा देते. कंपनीची शाश्वततेप्रती कटिबद्धता त्यांच्या इको-फ्रेण्डली डिझाइन्स आणि पाण्याची बचत करणाऱ्या वैशिष्ट्यांमधून दिसून येते. संशोधन व विकासावर प्रबळ भर देण्यासह टोटो उद्योग मानक स्थापित करत आहे आणि जगभरात बाथरूम अनुभवामध्ये सुधारणा करत आहे.
वेबसाइट: https://in.toto.com/
टोटो बाबत
किटाक्यूशू, जपानमध्ये टोटोच्या स्थापनेसह १९१७ मध्ये टोटो ग्रुपची स्थापना करण्यात आली. टोटो जगातील सर्वात मोठी बाथरूम फिक्स्चर्स व फिटिंग्ज उत्पादक कंपनी आहे, जिची वार्षिक विक्री (एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४) ७०२ बिलियन जॅपनीज येन आहे. १०० वर्षांहून अधिक काळापासून टोटो लक्झरी बाथरूम अनुभवामध्ये सुधारणा करणाऱ्या उत्पादनांसह नाविन्यता, तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि डिझाइनमधील अग्रणी म्हणून ओळखली जाते. आज, कंपनीचे १७ देशांमध्ये ३५,०२७ कर्मचारी आहेत आणि जगभरातील उत्पादन सुविधांची मालक आहे. आपल्या कॉर्पोरेट तत्त्वांद्वारे मार्गदर्शित टोटो ग्लोबल ग्रुप जगभरातील व्यक्तींचा विश्वास असलेली उत्तम कंपनी घडवण्याचा प्रयत्न करते, जी समाजाच्या भल्याप्रती योगदान देते. पर्यावरणाची काळजी घेण्यासह व्यक्तींच्या आरामदायीपणा, आकर्षकता व कार्यक्षमतेप्रती गरजांची पूर्तता करणारी उत्पादने डिझाइन करण्याप्रती समर्पित टोटो एकमेव प्लम्बिंग उत्पादक आहे, जी वैश्विक डिझाइन, प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती समर्पित संशोधन व विकास केंद्राचे देखरेख करते.
कंपनी उद्योग मानक आणि बाथ क्षेत्रात शक्य असलेल्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करत आहे, जेथे टोटोचा विश्वास आहे की उच्च दर्जाचे बाथरूम अनुभव व दैनंदिन लक्झरी आहे, ज्यांना व्यक्ती महत्त्व देतात आणि
प्रशंसा करतात.


