भारतपे टू-व्हीलर कर्ज आणि म्युच्युअल फंडवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट, 2024: भारतपे ही भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी आहे. भारतपे त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्व व्यापारी भागीदारांसाठी सुरक्षित कर्ज ऑफर करते. पहिल्या टप्प्यात, कंपनीने आपल्या विद्यमान व्यापारी भागीदारांसाठी टू-व्हीलर कर्ज आणि म्युच्युअल फंड (एलएएमएफ) द्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे. भारतपे ने टू-व्हीलर कर्जासाठी ओटीओ कॅपिटल आणि म्युच्युअल फंडवरील कर्जासाठी व्हॉल्ट मनीसोबत भागीदारी केली आहे. पुढील टप्प्यात अशा मल्टी-प्रोडक्ट आणि मल्टी-लेंडर ऑफरमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
भारतपे चे व्यापारी भागीदार आता ओटीओ कॅपिटलद्वारे त्यांच्या पुढील टू-व्हीलर खरेदीसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात, ज्यावरील व्याज देखील बऱ्यापैकी कमी असणार आहे. कर्ज अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे आणि व्यापारी 12 ते 48 महिन्यांदरम्यान परतफेडसाठी कोणताही कालावधी निवडू शकतात. याशिवाय, व्होल्ट मनीसह भागीदारी अंतर्गत, व्यापारी म्युच्युअल फंडवर 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देखील घेऊ शकतात.
ही सुविधा सुरू करताना, भारतपे चे सीईओ, नलिन नेगी म्हणाले – “2018 मध्ये लाखो ऑफलाइन व्यापारी भागीदारांना नवीन-युगातील फिनटेक उत्पादनांसह सक्षम बनवण्याच्या उद्देशाने भारतपे लाँच केले गेले. 2019 मध्ये आम्ही असुरक्षित कर्ज ऑफर सुरू करण्याचा आणि 0.5 ट्रिलियन यूएस डॉलरची एमएसएमई क्रेडिट गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यामुळे कंपनीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही खूप प्रगती केली आहे आणि आमच्या व्यापारी भागीदारांना 15,000 कोटी रुपयांहून अधिक असुरक्षित कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. आता आमची सुरक्षित कर्ज सुविधा आमचा क्रेडिट पोर्टफोलिओ मजबूत करेल. आमच्या 13 दशलक्षाहून अधिक व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल मी ओटीओ कॅपिटल आणि व्हॉल्ट मनीचे आभार मानतो.”
नलिन नेगी पुढे म्हणाले की, भारतपेच्या व्यापारी भागीदारांसाठी सुरक्षित कर्ज सुविधा आमच्यासाठी एक नवीन मुद्रीकरण चॅनल उघडेल आणि आमच्या व्यापाऱ्यांशी संपर्क वाढविण्यात मदत करेल कारण यामुळे त्यांना निवडण्यासाठी कर्ज सुविधांचा विस्तृत पोर्टफोलिओ उपलब्ध होईल. येत्या काही महिन्यांत, आम्ही सुरक्षित कर्ज श्रेणीमध्ये अधिक नवीन प्रोडक्ट्सचा समावेश करणार आहे, जेणेकरुन अनेक गरजा पूर्ण करता येतील. मला खात्री आहे येत्या काही महिन्यांत सुरक्षित कर्ज आमच्या एकूण महसुलात महत्त्वपूर्ण योगदान देतील. आम्ही आमच्या व्यापारी भागीदारांना सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणणे सुरू ठेवू.”
टू-व्हीलर कर्जाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना, ओटीओ कॅपिटलचे सीईओ सुमित छाजेड म्हणाले, “मोबिलिटी जीवन बदलू शकते यावर आमचा विश्वास आहे. भारतातील प्रत्येक इच्छुक उद्योजकासाठी टू-व्हीलर मालकी सुलभ आणि परवडणारे बनवणे हे आमचे ध्येय आहे. एकत्रितपणे, आम्ही सुलभ मोबिलिटी समाधान प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत ज्यामुळे व्यवसायांची भरभराट होण्यास मदत होईल. भारतपे सोबतची आमची भागीदारी भारताच्या उद्योजकीय भावनेला सशक्त करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहे. “एकत्रितपणे, आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे प्रत्येक व्यवसायाला भरभराटीची संधी मिळेल.”
म्युच्युअल फंडांवरील कर्ज सुरू करण्याबाबत बोलताना, भरत लांबा, सह-संस्थापक आणि सीबीओ, व्होल्ट मनी म्हणाले, “आम्ही भारतपे सोबतच्या या धोरणात्मक भागीदारीबद्दल खूप उत्सुक आहोत. एक कंपनी म्हणून, आम्ही भारतपेच्या भारतीय व्यापाऱ्यांच्या आर्थिक समावेशाच्या मिशनशी संरेखित आहोत. म्युच्युअल फंडवर झटपट कर्ज उपलब्ध करून देऊन, आम्ही एमएसएमईच्या शॉर्ट टर्म लिक्विडिटी आणि भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः तयार आहेत ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनवता येते. “भारतीय व्यवसायांना कमी किमतीत, 100% डिजिटल आर्थिक समाधान प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील हे सहकार्य एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना भारतपेच्या विविध व्यापाऱ्यांपर्यंत प्रवेश मिळेल.”
टू-व्हीलर कर्ज आणि म्युच्युअल फंडवरील कर्ज दोन्ही भारतपेच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. कर्ज वाटप आणि कलेक्शन भागीदारांकडून केले जाईल. भारतपे पुढील तीन महिन्यांत आपल्या ऑफरचा विस्तार करण्यासाठी तयार आहे, ज्यामध्ये व्यापाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची आणि कर्जदारांची ओळख करून देणार
आहे.


