▪️पुणे – भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेने वाढत्या विस्ताराबरोबर भारतीय विचार साधना फाऊंडेशन ही विक्री व्यवस्था उभी केली आहे. त्याच्या संकेत स्थळाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते झाले.
▪️साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे अग्रगण्य नाव म्हणजे भारतीय विचार साधना प्रकाशन. संस्थेने वाढत्या विस्ताराबरोबर भारतीय विचार साधना फाऊंडेशन ही विक्री व्यवस्था उभी केली आहे. राष्ट्रीय विचारांची संस्कारक्षम पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी नवीन संकेतस्थळ bhartiyvichar.in या नावाने सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन २२ ऑगस्ट रोजी रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते झाले.
▪️यावेळी संघ विचारांनी प्रेरित राष्ट्रीय साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. हे साहित्य समाजात सर्व स्तरात जाण्यासाठी आगामी काळात यावर ऑडियो बुक, इ बुक ई.पर्याय उपलब्ध करून देऊन याचा सर्वांना उपयोग होईल असा विश्वास आंबेकर यांनी व्यक्त केला.
▪️कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिपीन पाटसकर यांनी केले. भारतीय विचार साधना फाऊंडेशनतर्फे साहित्य विक्रीची माहिती अरविंद रावेतकर यांनी तर संकेतस्थळाची माहिती सोनम फराटे यांनी दिली.


