Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्‍यामध्‍ये पीटर इंग्‍लंडच्‍या सर्वात मोठ्या स्‍टोअरचे आकर्षक नवीन लुक आणि विस्‍तारित उत्‍पादन...

पुण्‍यामध्‍ये पीटर इंग्‍लंडच्‍या सर्वात मोठ्या स्‍टोअरचे आकर्षक नवीन लुक आणि विस्‍तारित उत्‍पादन श्रेणीसह रिलाँच

 

कसबाचे आमदार श्री. रविंद्र धानगेकर यांच्‍या उपस्थितीत भव्‍य रिलाँच साजरीकरण सोहळा संपन्‍न

पुणे, ऑगस्‍ट २३, २०२४: पीटर इंग्‍लंड या आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्‍या अधिपत्‍याखालील भारतातील आघाडीच्‍या मेन्‍सवेअर ब्रँडला उत्‍साही शहर पुण्‍यामध्‍ये आपल्‍या सर्वात मोठ्या स्‍टोअरच्‍या भव्‍य रिलाँचची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटत आहे. व्‍यापक ४००० चौरस फूटांहून अधिक जागेवर पसरलेल्‍या या प्रमुख स्‍टोअरमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत आणि आता आधुनिक डिझाइन व विस्‍तारित ऑफरिंग्‍जसह शॉपिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. कसबाचे आमदार माननीय श्री. रविंद्र धानगेकर यांनी उपस्थिती दाखवून भव्‍य पुनर्उद्घाटन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सुधारित स्‍टोअर वेडिंग कलेक्‍शनची सर्वात मोठी श्रेणी आणि प्रांतातधील कॅज्‍युअल वेअरची सर्वात व्‍यापक अॅरे देते, ज्‍यामुळे हे स्‍टोअर फॅशन व मूल्‍याप्रती जागरूक असलेल्‍या खरेदीदारांसाठी एक-थांबा गंतव्‍य आहे. ग्राहकांना विविध उच्‍च दर्जाचे, फॅशनेबल पोशाख पाहायला मिळतील, जे पुरूषांसाठी प्रत्‍येक प्रसंगाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये आकर्षक वेडिंग एन्‍सेबल्‍स, स्‍मार्ट फॉर्मल वेअर, ट्रेण्‍डी कॅज्‍युअल वेअर आणि इतर आवश्‍यक वॉर्डरोब जसे इनरवेअर व अॅक्‍सेसरीजचा समावेश आहे. या स्‍टोअरमध्‍ये पीटर इंग्‍लंडच्‍या सर्वोत्तम नवीन ऑफरिंग्‍ज असतील, जसे क्रिकेटप्रती प्रेमामधून प्रेरित प्रसिद्ध ‘जेण्‍टलमेन्‍स लीग कलेक्‍शन’, स्‍मार्ट यॉट जीवनशैलीसाठी डिझाइन करण्‍यात आलेले यॉट कलेक्‍शन आणि झोडियक स्‍टाइल्‍स कलेक्‍शन – १२ झोडियक स्‍टाइल्‍स दाखवणाऱ्या टॉप वेअरची श्रेणी, ज्‍यामुळे ग्राहक या श्रेणींसह स्‍वत: आकर्षित दिसू शकतात किंवा त्‍यांच्‍या प्रियजनांना गिफ्ट देऊ शकतात.

पीटर इंग्‍लंडचे ब्रँड सीओओ श्री. अनिल एस. कुमार स्‍टोअरच्‍या रिलॉंचबाबत आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “आम्‍हाला पूर्णत: नवीन लुक व फिलसह आमच्‍या सर्वात मोठ्या स्‍टोअरला रिलाँच करताना आनंद होत आहे. हे स्‍टोअर २००७ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेले आमचे सर्वात जुने प्रमुख स्‍टोअर आहे आणि ब्रँडसाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. आमचा पुण्‍यातील ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍याचा, तसेच त्‍यांच्‍या फॅशन गरजांनुसार व्‍यापक श्रेणी देत शॉपिंग अनुभव उत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ग्राहकांना एकाच छताखाली त्‍यांना आवश्‍यक असलेल्‍या सर्व गोष्‍टी मिळतील.”

संपूर्ण स्‍टोअर समकालीन डिझाइनसह सुधारण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये आरामदायीपणा व सोयीसुविधेचे उत्तम संयोजन आहे. विचारशीलपणे डिझाइन केलेले शॉपिंग सेक्‍शन्‍स, एैसपैस जागा असलेल्‍या ट्रायल रूम्‍स आणि आरामदायी आसन कक्ष उत्‍साहपूर्ण वातावरणाची निर्मिती करतात, ज्‍यामुळे ग्राहक उत्‍साहाने कलेक्‍शन्‍स पाहू शकतात. ओपन फ्लोअर प्‍लॅन, आकर्षक लायटिंग आणि आधुनिक फिक्‍स्‍चर्समधून पीटर इंग्‍लंडची फॅशन, दर्जा व मूल्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. आकर्षक नवीन लुक आणि विस्‍तारित ऑफरिंग्‍जसह पीटर इंग्‍लंडचे पुण्‍यातील सर्वात मोठे स्‍टोअर शहरातील मेन्‍स फॅशनसाठी अल्टिमेट गंतव्‍य बनण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामधून आनंददायी व संस्‍मरणीय शॉपिंग अनुभवाची खात्री मिळेल. एका छताखाली पीटर इंग्‍लंडच्‍या सर्वोत्तम ऑफरिंग्‍जना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासाठी आजच स्‍टोअरला भेट द्या.

नवीन पीटर इंग्‍लंड स्‍टोअरला येथे भेट द्या: पीटर इंग्‍लंड, उंब्रिया गणपती चौक, पुणे – ४११०३

०.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments