Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्ट समर्थने भारतातील कारागीर, विणकर, बचत गट, महिलांना आणि ग्रामीण उद्योजकांना सशक्त...

फ्लिपकार्ट समर्थने भारतातील कारागीर, विणकर, बचत गट, महिलांना आणि ग्रामीण उद्योजकांना सशक्त करण्यासाठी समर्पित एका कार्यक्रमाद्वारे ५ वर्षांच्या प्रवासाचा टप्पा साजरा केला.

फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन ऑपरेशन्स अकादमीने (SCOA) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाबरोबर (MSDE) एक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून भारतातील हजारो रोजगारक्षम युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांची गुणवत्ता वाढेल. भारतीय युवकांना पुरवठा साखळी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करून देऊन त्यांचे रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिल्ली – ऑगस्ट २०२४: फ्लिपकार्ट समर्थने आपल्या ५ वर्षांच्या प्रवासाचा टप्पा साजरा करण्यासाठी भारतातील कारागीर, विणकर, अल्पबचत गट महिला आणि ग्रामीण उद्योजकांना आणखी सशक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील 250 दिग्गज, विक्रेते, कारागीर, विणकर, हस्तकला कामगार आणि अल्प बचत गटातील लोक उपस्थित होते. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणं आणि त्याला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी. संयुक्त सचिव सोनल मिश्रा यांचा समावेश होता.

समर्थ कार्यक्रमात फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन ऑपरेशन्स अकादमीने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला. भारतभरातील हजारो रोजगारक्षम युवकांना कौशल्य प्रदान करणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) ४.० अंतर्गत, इ-कॉमर्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रात युवकांचे रोजगारक्षमतेचे कौशल्य वाढवणं हा या भागीदारीचा उद्देश आहे. फ्लिपकार्टची टीम उमेदवारांना ७ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर फ्लिपकार्टच्या केंद्रांवर ४५ दिवसांचे व्यावहारिक प्रशिक्षण देईल. या करारामुळे तसंच विशेष प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यक्रमांद्वारे युवकांना यशस्वी करिअरसाठी तयार केल्यामुळे देशाच्या आर्थिक वाढीत मोठे योगदान मिळेल.

कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी जागतिक मागण्यांसाठी युवकांना कौशल्यपूर्ण करण्याच्या सरकारच्या ठाम भूमिकेवर भर दिला आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या (विकसित भारत २०४७) दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचं सांगितले. फ्लिपकार्टच्या समर्थ उपक्रमाचा ५ वर्षांचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, “भारत सरकार आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य घटक असलेल्या कारागिरांना सशक्त बनवण्याच्या आणि विविध हस्तकला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. फ्लिपकार्टच्या करिअर अॅडव्हान्समेंट अकादमी (SCOA) आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) यांच्यातील भागीदारी, फ्लिपकार्ट समर्थच्या या कार्यक्रमात औपचारिकरित्या झाला. युवकांना आधुनिक बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पारंपारिक हस्तकलेचे डिजिटल क्षेत्रात एकत्रीकरण करून, आपण समर्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून मजबूत भागीदारी स्थापित करत आहोत आणि नवीन उपक्रमाला प्रोत्साहन देत आहोत, ज्यामुळे भारताच्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या वाढीचा मार्ग सुकर होईल.”

औद्योगिक भागीदारीचं महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “उद्योग क्षेत्राबरोबरची भागीदारी यशासाठी अत्यावश्यक आहे. इंटर्नशिप कार्यक्रम आणि समर्थसारख्या उपक्रमांद्वारे, आपण तरुणांना विकसित होत असलेल्या कार्यसंस्कृतीशी एकरुप होण्याची आणि भविष्यात आवश्यक असलेल्या कौशल्ये आत्मसात करण्याच्या संधी उघडत आहोत. जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या या घरगुती ब्रँड फ्लिपकार्टने महिला उद्योजक आणि वंचित गटातील व्यक्तींना सशक्त बनवून १८ लाखाहून अधिक लोकांच्या उपजीविकेवर सकारात्मक परिणाम केला आहे. लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, आणि संबंधित क्षेत्रांवर केंद्रित अकादमीच्या उद्घाटनासह, फ्लिपकार्ट ई-कॉमर्स परिसंस्थेत अधिक योगदान देत आहे, ज्यामुळे भारताच्या विकासाला अधिक चालना मिळत आहे.”

फ्लिपकार्ट समुहाचे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी रजनीश कुमार म्हणाले, “फ्लिपकार्टमध्ये, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि प्रोत्साहन देण्यावर आमचा विश्वास आहे. तसंच शाश्वत उपजीविका निर्माण करण्यावरही आमचा भर आहे. समर्थच्या ५ वर्षांच्या प्रवासाचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना भारतातील कारागीर, विणकर, आणि MSMEs यांना सशक्त करण्याबद्दलची आमची वचनबद्धता अधोरेखित होते. आमच्या समर्थ उपक्रमामुळे गेल्या ५ वर्षांच्या प्रवासात १८ लाखांहून अधिक उपजीविकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, १०० हून अधिक पारंपारिक कला प्रकारांचे संरक्षण केलं आहे, आणि हजारो विक्रेत्यांच्या विकासाला चालना दिली आहे. भविष्याकडे पाहताना, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबतची आमची भागीदारी भारताच्या युवकांना डिजिटल अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करेल. त्यामुळे आपल्या वारशाचा ठेवा भावी पिढ्यांच्या हाती अधिक समृद्ध होईल.”

फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमात कारागीर सशक्तीकरणाच्या भविष्यावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या पॅनेलमध्ये अनेक उद्योग क्षेत्रातील दिग्गज लोक सहभागी झाले होते, त्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अतीश कुमार सिंह, नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चीफ प्रोग्राम ऑफिसर महेंद्र पयाल. बी युनिक च्या सह-संस्थापक आणि संचालक सिम्मी नंदा; आणि अखिल भारतीय कारागीर आणि हस्तकला कामगार कल्याण संघटनेच्या कार्यकारी संचालिका मीनू चोपड़ा यांचा समावेश होता. या चर्चेत भारतातील कारागीर समुदायाचे आजच्या जलदगतीने बदलत असलेल्या वातावरणात भविष्य, कौशल्य विकासाचे महत्त्व, आणि ई-कॉमर्सची बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका यांचा सखोल आढावा घेतला गेला.

कारागिरांना आधार देणं आणि सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर त्यांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी , फ्लिपकार्टने या कार्यक्रमात आपल्या अॅपवर ‘समर्थ स्टोअरफ्रंट’ इंडियन रूट्सचं अनावरण केले. या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे कारागीर, विणकर, आणि लघु तसंच मध्यम उद्योगाला राष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळतो. त्यामुळे त्यांना आपली अनोखी उत्पादनं भारतभरातील 50 कोटींहून अधिक ग्राहकांपर्यंत नेण्याची संधी मिळते.

या कार्यक्रमामुळे सरकारी नेते, उद्योगतज्ज्ञ, आणि महत्त्वपूर्ण स्टेकहोल्डर्स, यांना डिजिटल युगात कारागीर सशक्तीकरणाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान मिळालं. या कार्यक्रमात पारंपारिक हस्तकला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. ज्यामुळे लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण केली जाऊ शकते

.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments