पुणे, २६ ऑगस्ट २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने नुकतेच पुण्यामध्ये अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम ‘देश का ट्रक उत्सव २.०’चे आयोजन केले. २०२३ मध्ये या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त यशाला अधिक पुढे घेऊन जात यंदा इव्हेण्टमध्ये पुण्यातील ट्रकिंग समुदायाला टाटा मोटर्सच्या इंटरमीजीएट, लाइट अँड मीडियम कमर्शियल वेईकल्स (आयएलएमसीव्ही) श्रेणीच्या उच्च दर्जाच्या इंधन-कार्यक्षम गतीशीलता सोल्यूशन्सना दाखवण्यात आले.
लॉजिस्टिक्स क्षेत्रातील उपस्थितांनी आधुनिक उत्पादन नाविन्यता आणि मूल्यवर्धित सेवांच्या सखोल प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. या इव्हेण्टमध्ये सुरू असलेल्या वाहन चाचण्यांमधील प्रेरणादायी डेटाला देखील दाखवण्यात आले, ज्यामधून त्यांना बीएस-६ फेज २ श्रेणीची इंधन कार्यक्षमता आणि लाभक्षमतेबाबत बहुमूल्य माहिती मिळाली. तसेच, कंपनीने विविध प्रमुख ग्राहकांचा त्यांचा सहयोग व पाठिंब्यासाठी सन्मान केला, ज्यामुळे एकूण अनुभव अधिक लाभदायी ठरला.
मोरे ट्रान्सपोर्टचे मालक श्री. शंकर मोरे म्हणाले, ”अनुभवी परिवहनकर्ता म्हणून तुम्हाला माहित आहे की, इंधन कार्यक्षमता आपल्या व्यवसायामधील महत्त्वाचा घटक आहे. टाटा ट्रक्सचा नियमित ग्राहक म्हणून मी पुण्यामध्ये या इव्हेण्टचे आयोजन करण्यासाठी कंपनीचे आभार मानतो. मला इंधन-कार्यक्षम उत्पादने व मूल्यवर्धित वैशिष्ट्यांच्या नवीन श्रेणीबाबत माहिती मिळाली, ज्यांचा मी फायदा घेत माझा व्यवसाय अधिक लाभदायी करू शकतो.”
साई राज ट्रान्सपोर्टचे मालक श्री. सागर पवार म्हणाले, ”ट्रक उत्सव २.० ला उपस्थित राहण्याचा अनुभव अत्यंत माहितीपूर्ण ठरला. मी टाटा मोटर्सचे आधुनिक इनोव्हेशन्स आणि त्यांच्या ट्रक्सची उच्च दर्जाची इंधन कार्यक्षमता पाहून प्रभावित झालो. टाटा फ्लीट एज, स्थिर वार्षिक देखरेख करार आणि टाटा ओके प्रोग्रामचे एक्स्चेंज उपक्रम अशा प्रमुख मूल्यवर्धित सेवांबाबत देण्यात आलेली माहिती सर्व ऑपरेटर्ससाठी महत्त्वाची आहे. मला आता टाटा मोटर्सच्या ट्रक्सच्या नवीन श्रेणीसह माझा व्यवसाय अधिक वाढवण्याकरिता अधिक आत्मविश्वासपूर्ण व सक्षम वाटते.”
टाटा मोटर्स ४ ते १९ टन जीव्हीडब्ल्यूपर्यंत आयएलएमसीव्ही श्रेणीमधील उत्पादनांची व्यापक रेंज देते. वेईकल्स प्रबळपणे डिझाइन आणि प्रखरपणे चाचणी करण्यात आली आहेत, ज्यामधून विविध उपयोजनांमध्ये ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता होण्याची खात्री मिळते. आयएलएमसीव्ही पोर्टफोलिओ एलपीटी, एसएफसी, सिग्ना व अल्ट्रा रेंज अशा विविध केबिन पर्यायांसह, तसेच विविध डेक लांबी व बॉडी स्टाइल्समध्ये उपलब्ध आहे. एकट्या महाराष्ट्रात, कंपनीचे ३४० धोरणात्मकरित्या स्थित विक्री व सेवा टचपॉइण्ट्स आहेत, जे राज्यभरात सर्वसमावेशक पाठिंबा व उपलब्धता देतात. देशभरात टाटा मोटर्सचे २५०० हून अधिक विक्री व सेवा टचपॉइण्ट्स आहेत, जे वेईकल्सच्या सर्वोच्च अपटाइमसाठी सुलभपणे स्पेअर पार्टस् उपलब्ध करून देतात.
–


