Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेस बँकेने ठेवींच्या वाढीवर नियामक लक्ष केंद्रित करून मिळविलीमजबूत वार्षिक 20.8% ची...

येस बँकेने ठेवींच्या वाढीवर नियामक लक्ष केंद्रित करून मिळविलीमजबूत वार्षिक 20.8% ची वाढ

बँकेवर ग्राहकांचा असलेला मजबूत विश्वास आणि स्थिर आर्थिक पाया दर्शवत येस बँकेने वर्षभरातील ठेवींमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली.

 

· कमी किमतीच्या ठेवी आकर्षित करण्यासाठी आणि बँकेची तरल स्थिती सुधारण्यासाठी प्रभावी धोरणे दर्शवत बँकेचे CASA गुणोत्तर प्रमाण आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 30.8% पर्यंत वाढले आहे.

 

 

 

मुंबई, २७ ऑगस्ट २०२४ – खासगी क्षेत्रातील भारतातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या येस बँकेने आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 2,65,072 कोटी रुपयांपर्यंत एकूण ठेवींमध्ये वार्षिक 20.8% (Y-o-Y) वाढ नोंदविली आहे. बँकेने गेल्या चार वर्षांत केलेल्या यशस्वी उलाढालीवर भर देत, या लक्षणीय वाढीतून ग्राहकांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. बँकेने घालून दिलेला भक्कम आर्थिक पाया आणि ग्राहककेंद्रित धोरणांवरही यातून प्रकाश पडतो.

 

 

 

बँकिंग उद्योगासमोर वाढत्या पत मागणीसह ठेवींच्या वाढीत समतोल साधण्याचे आव्हानात्मक काम असलेल्या वातावरणात, येस बँकेने केवळ गती राखली असे नाही, तर उद्योगातील सरासरीही ओलांडली आहे. बँकिंग क्षेत्राची आर्थिक लवचिकता वाढविण्याच्या उद्देशाने अलीकडील नियामक मार्गदर्शनाद्वारे भर घातल्याप्रमाणे हे यश ठेवींच्या वाढीवर असलेल्या व्यापक उद्योगक्षेत्राच्या लक्ष्याशी सुसंगत आहे.

 

 

 

येस बँकेच्या यशाचा मुख्य घटक म्हणजे, त्याचा कमी किमतीचा ठेव आधार वाढविण्यावर असलेला धोरणात्मक भर आहे. बँकेने तिच्या CASA (चालू खाते बचत खाते) गुणोत्तरामध्ये लक्षणीय सुधारणा पाहिली असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 29.4% वरून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये 30.8% पर्यंत वाढले आहे. ही सुधारणा म्हणजे, बँकेने ग्रॅनुलर CASA ठेवींवर लक्ष केंद्रित केल्याचा परिणाम आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये अंदाजे 17 लाख नवीन CASA खात्यांची भर पडली आहे. अधिकाधिक नवनवीन ग्राहक मिळविणे आणि टिकवून ठेवणे या प्रयत्नांतील प्रभावीपणा दर्शवत CASA बॅलन्समध्ये 23% वाढ झाल्याने बँकेचा कमी किमतीचा ठेवी आधार आणखी मजबूत झाला आहे.

 

 

 

या भक्कम कामगिरीला बँकेच्या वितरण नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक गुंतवणुकीद्वारेही पाठबळ मिळते. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये येस बँकेने CASA समृद्ध क्लस्टर्समध्ये 133 नवीन शाखा उघडल्या. त्यामुळे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांची आता एकूण 1,453 आउटलेट झाली आहेत. ग्राहकांचा सहभाग वाढवून आणि ठेव वाढीस चालना देत या विस्तारामुळे बँकेला वित्तीय उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्याची अनुमती मिळाली आहे. परिणामी, बँकेने गेल्या दोन वर्षांत शाखा बँकिंगच्या प्रणीत ठेवींमध्ये 22.3% चा कंपाउंड ॲन्युअल ग्रोथ रेट (CAGR) गाठला आहे. खासगी बँकांमधील या उद्योगक्षेत्रातील सरासरी 11.9% आणि 17.4% CAGR पेक्षा तो जास्त आहे.

 

 

 

ठेवींच्या वाढीतील बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय तीन प्रमुख घटकांना दिले जाऊ शकते:

 

· उत्पादकता वाढ: विद्यमान आणि विस्तारित फ्रंचाइजमध्ये कार्यक्षमता वाढविणे.

 

· ग्राहक संख्येत वाढ : उच्च-मूल्य ग्राहक संख्येत वाढ करण्यावर जोरदार लक्ष

 

· नवीन अधिग्रहण मूल्या(एनएव्ही)मध्ये वाढ: मुदत ठेव आधाराची गुणवत्ता आणि मूल्य सुधारणे.

 

 

 

ही गती कायम ठेवण्यावर येस बँक सातत्याने काम करत असल्यामुळे ग्राहक संबंध अधिक दृढ करून, आपल्या उत्पादन योजनांचा विस्तार करून आणि ठेवींच्या वाढीचे धोरण सतत बदलत असलेल्या नियामक गरजा आणि बाजाराच्या परिस्थितीशी सुसंगत राहील, याची खात्री करून ही वाढ टिकवून ठेवण्यावर बँकेचे लक्ष केंद्रित आहे.

 

 

 

भविष्याचा विचार करता प्रभावशाली ठेवीमधील वाढ, यामुळे येस बँक वाढते आर्थिक स्थैर्य, वाढलेली पतपुरवठा क्षमता आणि सुधारित नफा यामध्ये आघाडीचे स्थान मिळवत आहे. वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी आणि आगामी वर्षांमध्ये बाजारपेठेतील स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही प्रमुख कारणे ठरतील

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments