हे जागतिक पातळीवरचं पहिलंच असं रुपे क्रेडिट कार्ड आहे ज्यामध्ये यूपीआय वापराच्या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर ९० रुपयांपासून ९ लाखाचे क्रेडिट लिमिट आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
● को-ब्रँडेड क्रेडिट कार्डमध्ये रूपे नेटवर्कवरील सुरक्षित क्रेडिट कार्ड असून यूपीआयचा सर्व प्रकारे वापर करू शकतो.
● युजर्सना फक्त ₹100 इतक्या कमी ठेवीच्या आधारावर हे क्रेडिट कार्ड मिळवू शकतं. या ठेवीवर आकर्षक व्याज देखील मिळतं.
● यूपीआय,, पीओएस आणि इ कॉमर्स या व्यवहारात उत्कृष्ट रिवॉर्ड मिळतात.
मुंबई – ऑगस्ट २०२४: सुपर.मनी या क्रेडिट-फर्स्ट यूपीआय प्लॅटफॉर्म, ने आज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेबरोबर आपले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुपर कार्ड लाँच केलं. हे क्रेडिट कार्ड नियमित व्यापारी पेमेंट्ससह यूपीआय व्यवहारांनाही आधारभूत ठरतं. सुपर.मनीच्या ‘स्कॅन अँड पे’ फिचरचा वापर करून यूपीआय इंटिग्रेशनमुळे भारतात क्रेडिट कार्ड्सच्या स्वीकारार्हतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशा वेळी ही घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, सुमारे ३० टक्के नवीन क्रेडिट कार्ड्स आता रूपे नेटवर्कवर जारी केले जात आहेत.
उद्योग क्षेत्रातील पहिल्यावहिल्या अशा उपक्रमात, सुपर.मनी युजर्सना फक्त ९० रुपये इतक्या कमी मर्यादेचे क्रेडिट कार्ड १०० रुपये ते १० लाख या ठेवींच्या श्रेणीमध्ये सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या विस्तृत श्रेणीमुळे सर्व स्तरातील ग्राहकांना ‘क्रेडिट ऑन यूपीआय’ या व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळते. ठेवीवर आकर्षक व्याजदर मिळत असल्याने युजर्सना त्यांचा क्रेडिट प्रोफाईल तयार करण्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या निधीवर आकर्षक परतावा मिळवण्याचा दुहेरी लाभ मिळतो.
कार्डधारकांना सुपर कार्ड्स रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये सहभागी केलं जातं. कार्डधारकांना सूपर यूपीआय ला ॲक्सेस मिळतो. मिंत्रावर व्यवहारांवर ५%* सूट, क्लिअरट्रिपवर ३%* सूट, आणि फ्लिपकार्टवर २%* सूट मिळते.यूजर्स निवडक व्यवहारांवर 0.५ % कॅशबॅक देखील मिळवू शकतात. एकदा नोंदणी केल्यानंतर, यूजर्सना प्रत्येक खरेदीसह आपोआप कॅशबॅक रिवॉर्ड्स मिळतात. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी होते आणि तात्काळ आर्थिक लाभ मिळतो.
या भागीदारीवर बोलताना, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोविंद सिंह म्हणाले, “भारताचे पहिले एफडी-लिंक्ड यूपीआय-एनेबल्ड को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड देण्यासाठी सुपर.मनीसोबतची आमची भागीदारी ही नावीन्यपूर्ण आर्थिक सोल्यूशन्स देण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. लोअर क्रेडिट पेनिट्रेशन असलेल्या क्षेत्राला क्रेडिट कार्डचे फायदे देऊन बाजारपेठेचा विस्तार करण्याच्या आमच्या धोरणाशीही हे सुसंगत आहे. सुपर.मनीच्या प्लॅटफॉर्मसोबत आमच्या सेवांचे एकत्रीकरण करून, लोकांना सकारात्मक क्रेडिट प्रोफाइल तयार करण्याची आणि भविष्यात अधिक कर्ज उत्पादनं उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. या उपक्रमाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि ग्राहकांच्या आर्थिक प्रवासावर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल आम्हाला अपेक्षा आहेत.”
ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये सुरक्षित क्रेडिट कार्ड लाँच करताना, सुपर.मनीचे संस्थापक आणि सीईओ प्रकाश सिकरिया म्हणाले, “यूपीआय वरील क्रेडिटमुळे मागणीला न्याय मिळाला आहे. मात्र पुरवठा क्षेत्रात अजूनही आव्हानं आहेत. विशेषत: क्रेडिट क्षेत्रात सामान्य लोकांना कसं आणायचं कारण या क्षेत्राबद्दल फारसं लिहिलं बोललं जात नाही. या सर्वसमावेशक क्रेडिट कार्ड मुळे मुख्य प्रवाहातील क्रेडिटपासून वंचित राहिलेल्या कोट्यवधी भारतीयांचा वित्तीय समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे असून आता त्यांना त्यांचा क्रेडिट प्रवास करता येईल. आमच्या सर्वात कमी असलेल्या व्हेरिएंटमध्ये एक डॉलरची ची मर्यादा आहे. जागतिक पातळीवर ती पहिलीच आहे. यापुढे जाताना आम्ही आमच्या वित्तीय सेवेचा विस्तार करून क्रेडिट या प्रकाराचे लोकशाहीकरण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहो
त.


