🟦
▪️पिंपरी चिंचवड – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारताला पॅराऑलंपिक मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा कुटुंब प्रबोधन शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
▪️थेरगाव येथील पद्मश्री पेटकर यांच्या निवासस्थानी कुटुंब प्रबोधन समितीचे सहप्रांत संयोजक प्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते भारतमातेची प्रतिमा, ग्रंथभेट, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
▪️भारतीय परंपरेचे जतन करत कुटुंब व्यवस्था सुदृढ राहावी या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन कुटुंब प्रबोधन समितीच्या वतीने करण्यात येते. यावेळी मयुरेश डंके यांनी पेटकर यांची प्रकट मुलाखत घेतली. आभार धैर्यसिंह पाटील यांनी मानले.


