Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाऊंनट ड्यूचा घोट घ्या आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री ने कौन बनेगा करोडपतीमध्ये...

माऊंनट ड्यूचा घोट घ्या आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री ने कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रवेश मिळवा लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या भारताच्या लोकप्रिय गेम शो मध्ये आपली क्षमता तपासण्यासाठीची योग्य संधी

 

 

 

माऊंटन ड्यू हा ब्रँड शौर्याशी साधर्म्य साधणारा आहे. माऊंटन ड्यूने प्रसिद्ध गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ बरोबर एक करार केला आहे त्यानुसार या गेम शोच्या 16 व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेण्याची संधी आहे. यामुळे माऊंटन ड्यूच्या ग्राहकांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून हा गेम खेळण्याची संधी मिळणार आहे. या खेळात भाग घेण्याचा अधिकृत काळ संपल्यावरही ही संधी मिळणार आहे.

 

माऊंटन ड्यू आणि केबीसी लोकांना प्रेरणा देऊन आपल्या आत असलेली भीती घालवून शौर्य दाखवण्यासंदर्भात कटिबद्ध आहे. ही भागीदारी त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे ‘ये खेल ग्यान का है, पर जीता हिम्मत से जाता है.’ ही माऊंटन ड्यू आणि केबीसीच्या कॅम्पेनची थीम आहे.

 

या भागीदारीबदद्ल बोलताना पेप्सिको कंपनीच्या माऊंटन ड्यू कॅटेगरी हेड आकांक्षा दलाल म्हणाल्या, “माऊंटन ड्यू ने कायमच भीतीचे नियमन केले, शौर्याचा गौरवर केला आहे आणि एखाद्याच्या आयुष्याच्या जेव्हा हॉट सीटवर बसण्याची वेळ येते तेव्हा त्याला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे केबीसी बरोबरची ही भागीदारी अगदी स्वाभाविक आहे कारण या शो मध्ये असे क्षण येतात जेव्हा बरंच काही पणाला लागलेलं असतं, ज्ञान आणि शौर्याची प्रत्येक टप्प्यावर परीक्षा होते. वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या ऑफरमुळे अनेकांना आपलं स्वप्न साकार करण्यासाठी धाडसी पावलं टाकण्याची प्रेरणा मिळेल अशी माऊंटन ड्यूला अपेक्षा आहे.”

 

१५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात ग्राहक माऊंटन ड्यू x केबीसी पॅक विकत घेऊ शकतात. त्यावर एक क्यूआर कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांसमोर एक व्हॉट्स अप बॉट येईल. तिथे लेबलच्या मागे असलेला १६ डिजिटचा कोड टाकू शकतील. त्यानंतर आपली माहिती देऊन एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. या पायऱ्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना ऑडिशनच्या टप्प्यावर जाण्याची संधी मिळेल. त्यातील दहा नशीबवान स्पर्धकांना केबीसीच्या एक्स्ल्युझिव्ह ‘वीक ऑफ करेज’ मध्ये भाग घेण्याची संधी मिळेल.

माऊंटन ड्यू x केबीसी हे कॅम्पेन टीव्हीवर जाहिराती आणि ३६० कॅम्पेनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं जाईल. स्पेशल माऊंटन ड्यू पॅक्स सर्व दुकानात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments