पुणे,6 सप्टेंबर 2024 :- बेअरच्या कन्झ्युमर हेल्थ विभागाचा भाग असलेल्या व भारतातील आघाडीचा मल्टीविटॅमिन ब्रँड असलेल्या सुप्राडीन ने 10 शहरांमध्ये सुप्राडीन फटीग सर्व्हे केला आहे.राष्ट्रीय पोषण सप्ताह दरम्यान या सर्वेक्षणाचे अनावरण झाले असून सुप्राडीनचे वन नेशन 100% न्युट्रिशन ही मोहिम अधोरेखित करते.या सर्वेक्षणात तब्बल 85 टक्के भारतीय तरूण थकलेले किंवा कंटाळलेल्या अवस्थेत उठतात. हे सर्व्हेक्षण 10 शहरातील एनसीसीएसए व बी गटातील 25 ते 45 वयोगटातील पुरूष आणि स्त्रियांमध्ये करण्यात आले. हे सर्वेक्षण 20 दशलक्ष लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. या सर्वेक्षणानुसार 96 टक्के भारतीयांना त्यांच्यात आवश्यक सुक्ष्म अन्न द्रव्ये (मायक्रोन्युट्रियंटस) आणि मल्टी विटॅमिन्सचा अभाव असल्याने कमी उर्जा पातळी असते. मायक्रोन्युट्रियंटसचा अभाव असल्याचे वाटणाऱ्या सर्वाधिक लोकसंख्येमध्ये बंगळुरू (59%) आणि पुणे (57%) आहे.


